जिल्हाधिकारी साहेब बेलगावच्या आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या मनरेगा अंतर्गत विहीरीचे बिल 5 वर्षापासून रखडले




 

जिल्हाधिकारी साहेब बेलगावच्या आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या मनरेगा अंतर्गत विहीरीचे बिल 5 वर्षापासून रखडले

साहेब शेतकरी मेला तरी त्याची वनवन कधी थांबणार

 

मांजरसुबा -(दादासाहेब जोगदंड)

बीड जिल्ह्य़ातील मनरेगा अंतर्गत मोठ्याप्रमाणात गैरव्यवहार असून

असाच शेतकरी बीड तालुक्यातील बेलगाव येथील आत्महत्याग्रस्त योजने अंतर्गत दिलेल्या विहीरीचे खोदकाम व संपूर्ण बांधकाम होऊन 5 वर्ष उलटली, शासन दरबारी हेलपाटे मारून कंटाळलेल्या आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या मुलाने अखेर सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्यासह तात्काळ बिल मिळण्यासाठी गुरूवार,पासून त्याच विहीरीत उतरून ठीय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी बीड, मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड, उपमुख्य कार्यकारी आधिकारी(पंचायत)जिल्हापरिषद बीड,नरेगा गटविकास आधिकारी जिल्हापरिषद बीड यांच्यामार्फत विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांना निवेदन दिले आहे.
बीड तालुक्यातील मौजे बेलगाव येथील परमेश्वर लक्ष्मण कोळपे वय 45 वर्षे यांनी 1 जुन 2009 साली नापिकीला कंटाळुन लिंबाच्या झाडाला गळफास लाऊन आत्महत्या केली. त्यानंतर त्यांच्या पत्नी दैवशाला ऊर्फ शालन परमेश्वर कोळपे यांना आत्महत्याग्रस्त योजनेतुन मनरेगा अंतर्गत 3 लाख 20 हजार रू अंदाजित किंमत, विहीर मिळाली, त्यांनी 2016 मध्येच खोदकाम व विहीरीचे बांधकाम केले, परंतु आज रोजी 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटुन सुद्धा देयके मिळाले नाहीत,

बिल मिळण्यासाठी त्याच विहीरीत उतरून ठीय्या आंदोलन !
गेल्या पाच वर्षापासून शासन दरबारी चिरीमिरी देऊन सुद्धा बिल न मिळाल्यामुळे व उधार उसनवारीवर घेतलेले पैसे आदि गोष्टींचा आर्थिक व मानसिक ताण होत असल्याने अखेर दि.15 जुलै गुरूवार रोजी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली ईश्वर परमेश्वर कोळपे सह तात्काळ बिल मिळण्यासाठी त्यात विहीरीत उतरून ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याबद्दल सांगितले आहे

पाच वर्षापासून शासन दरबारी चिरीमिरी देऊन सुद्धा बिल न मिळाल्यामुळे व उधार उसनवारीवर घेतलेले पैसे आदि गोष्टींचा आर्थिक व मानसिक ताण होत असल्याने अखेर दि.15 जुलै गुरूवार रोजी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली ईश्वर परमेश्वर कोळपे सह तात्काळ बिल मिळण्यासाठी त्यात विहीरीत उतरून ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याबद्दल सांगितले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा