प्रधानमंत्री आवास योजनेचा तिसरा हप्ता वितरीत करा।




शिवरत्न मावळा प्रतिष्ठाण; सचिन बोबडे यांची मागणी
गोरगरीबांची घरे राहू लागली अर्धवट।
बीड । भारत केंद्र सरकारची प्रधानमंत्री आवास योजनेची कामे सुरु झालेली असताना अनेकांना याचा लाभ मिळत आहे. अनेक मंजुरी प्रकरणे मार्गी लागत असून परंतू काही दिवसांपासून या योजनेला मंदगती प्राप्त झाली असून अधिकारी, कर्मचार्‍यांच्या दिरंगाईमुळे ही कामे प्रलंबीत होत चालली आहे. यामुळे सर्वसामान्य, गोरगरीब नागरिकांची स्वप्ने धुळीस मिळत आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना 2.50 लाख रूपयांचा निधी केंद्राकडून मिळतो. आतापर्यंत जी प्रकरणे मंजुरी होवून मार्गी लागली त्या लाभार्थ्यांना योजनेची दोन हप्ते मिळाली असून तिसरा हप्ता अद्याप मिळालेला नाही. तब्बल दिड वर्षापासून तिसरा हप्ता न मिळाल्यामुळे गोरगरीबांच्या घराची स्वप्ने अर्धवट राहत आहे. अनेक लोकांची घरांची कामे रखडली असून ती स्वत: ते पुर्ण करू शकत नाहीत. शासनाच्या येणार्‍या तिसर्‍या हप्त्याद्वारेच म्हणजे येणारा 1.50 लाख रूपयांच्या निधीने अर्धवट घरे पुर्णत्वास जावू शकतात. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याची गंभीर दखल घेवून प्रधानमंत्री आवास योजनेला घीळ बसलेली काढावी आणि गोरगरिबांच्या घराच्या स्वप्नास अडथळा निर्माण झालेल्या तिसर्‍या हप्त्याची रक्कम तात्काळ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करावी अशी मागणी शिवरत्न मावळा प्रतिष्ठाणचे सचिन बोबडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा