जिल्हा बँकेतर्फे खरिप हंगामांतर्गत शेतकर्‍यांना 687 कोटीचे पीककर्ज वाटप




लातूर : राज्यात अव्वल स्थानावर असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने माजीमंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप हंगाम 2021 अंतर्गत लातूर जिल्ह्यातील 10 तालुक्यातील 1 लाख 64 हजार पात्र असलेल्या शेतकरी सभासदांना आजतागायत तब्बल 687 कोटी रुपयांचे पिक कर्ज वाटप करण्यात आले असून बँकेकडे आलेल्या सर्व पात्र सभासदांना 100 टक्के वाटप करण्यात आले आहे. अशी माहिती लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन अ‍ॅड. श्रीपतराव काकडे यांनी दिली आहे. दरम्यान खरीप पीक कर्ज वाटप करण्यात मराठवाडा आणि विदर्भ विभागात लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अव्वल स्थानावर राहिली आहे.

जिल्ह्यातील शेतकर्‍याची मातृत्व संस्था असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकरी हा केंद्रबिंदू मानून वेळेत शेतकर्‍यांना कर्ज पुरवठा केलेला आहे. बँकेचे मार्गदर्शक राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेने नेहमी शेतकर्‍यांना अडचणीच्या काळात आर्थिक मदत देण्यासाठी भूमिका घेतली असून त्यासाठी ज्या शेतकर्‍यांनी पिक कर्जासाठी प्रस्ताव सादर केले होते त्या सर्व पात्र शेतकरी सभासदांस आजतागायत 100 टक्के पिक कर्ज वाटप करण्यात आले असून चालु खरिप हंगामात 2021 मध्ये जिल्ह्याच्या वार्षिक पतपुरवठामध्ये जिल्हा बँकेला 33 टक्के हिस्सा असून खरीप पिक कर्जासाठी 747 कोटी रुपयांचा लक्षांक देण्यात आला आहे बँकेस प्राप्त आलेल्या मागणीनुसार माहे जुन अखेर बँकेच्या वतीने 10 तालुक्यातील 1 लाख 64 हजार 142 शेतकर्‍यांना 687 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले असून मागणी केलेल्या सर्व पात्र सभासदांना 100 टक्के वाटप करण्यात आले असून उर्वरीत पिककर्ज वाटप प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन श्रीपतराव काकडे यांनी दिली. याप्रमाणे जिल्हा बँकेत पात्र असलेल्या शेतकरी सभासदांना 100 टक्के

पिक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

 

आतापर्यंत झालेले पिक कर्ज वाटप

लातूर 107 कोटी 60 लाख 61 हजार

औसा 123 कोटी 4 लाख 72 हजार

निलंगा 91 कोटी 13 लाख 10 हजार

उदगीर 79 कोटी 58 लाख 66 हजार

अहमदपूर 88 कोटी 49 लाख 19 हजार

चाकुर 51 कोटी 63 लाख 6 हजार रुपये

रेणापूर 50 कोटी 39 लाख 89 हजार रुपये

जळकोट 31 कोटी 39 लाख 2 हजार रुपये

देवणी 25 कोटी 4 लाख 32 हजार

शिरूर अनंतपाळ 38 कोटी 79 लाख 35 हजार.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा