अनैतिक संबंधातून एकाचा खून




वसमत : येथे कारखाना रोडवर  रविवारी 11 जुलै सकाळी 8 ते 8:30 सुमारास  खुनाची घटना घडली. पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय बाळासाहेब खर्डे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू सिद्दिकी, कृष्णा चव्हाण, कर्मचारी यांनी काही तासातच आरोपीचा शोध घेतला. आरोपी असलेल्या पती- पत्नीला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील कारखाना रोडवर जवळील वसाहतींमध्ये राहणार्‍या एका महिलेने किशन रमेश चन्ने रा. गणेशपेठ वसमत याला घरी बोलावले. पती बाबुराव गायकवाड अचानक घरी आला, त्या महिलेसोबत किशन चन्ने हा दिसला.  दोघांना एकत्र पाहिल्याने भांबावलेल्या महिलेने किशन चन्ने हा माझ्यासोबत बळजबरी करीत असल्याचे सांगितले. पत्नीच्या सांगण्यावरुन बाबुराव गायकवाड यांनी घरातील चाकू घेऊन किशन चन्ने यांच्यावर  पोटात वार केले. यामध्ये किशन  रमेश चन्ने गंभीर जखमी झाला. 10 वाजता शासकीय  उप रुग्णालय त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केला. दुर्गा किशन चन्ने  मयताची पत्नी यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी  पती- पत्नीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पती पत्नी दोघांना अटक केले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी यतिष देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब खार्डे करत आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा