क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन




नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू आणि महान फंलदाज यशपाल शर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेले आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. माजी कर्णधार कपिल देव यशपाल शर्मा यांच्या मृत्यूनंतर अश्रू रोखू शकलेले नाही. टीव्ही चॅनेलवर बोलताना ते रडू लागले. यशपाल यांनी बीसीसीआयच्या निवड समितीच्या सदस्यपदाची जबाबदारीही पार पाडली होती.

शर्मांची कारकीर्द : भारताकडून यशपाल शर्मा यांनी ३७ कसोटी सामन्यांमध्ये १ हजार ६०६ धावा कुटल्या आहेत. यात १४० धावा ही त्यांची सर्वोत्तम खेळी होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांनी ४२ सामन्यात २८.४८च्या सरासरीने ८८३ धावा केलेल्या आहे.

१९८३च्या वर्ल्डकपचे किंगमेकर: १९८३च्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या विजयासह सुरुवात केली. शर्मा यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. जेव्हा ते क्रीजवर आले तेव्हा संघाची धावसंख्या ३ बाद ७६ अशी होती, त्यानंतर भारताने ५ बाद १४१ अशी मजल मारली. शर्मा यांनी १२० चेंडूंत ८९ धावांची खेळी खेळली. ऑस्ट्रेलिया विरुद्ध आक्रमक ४० धावा असोत किंवा कठीण परिस्थितीत इंग्लंडविरुद्ध ६१ धावांची खेळी, शर्मा यांनी भारताला नेहमीच तारले. शर्मा यांनी या स्पर्धेत ३४.२८च्या सरासरीने २४० धावा केल्या.

 

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा