भारत आणि श्रीलंका सामन्यांच्या वेळापत्रकात मोठा बदल; 18 तारखेला रंगणार पहिला सामना




कोलंबो : भारतीय संघ सध्या नवनिर्वाचित कर्णधार शिखर धवनच्या नेतृत्त्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर पोहचलेला आहे. संघातील सर्व खेळाडूने आवश्यक तो विलगीकरणाचा कालावधी संपवून सराव सामने देखील खेळायाल सुरूवात केले आहे. तसेच, 13 जुलै रोजी पहिला एकदिवसीय सामना खेळण्यासाठी भारतीय आणि श्रीलंका संघ सज्ज झाले होते. पण तितक्यात कोरोनाच्या संकटामुळे सामन्यांच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला असून पहिला सामना आता 18 तराखेला रंगणार आहे, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
श्रीलंका दौऱ्यावर 13 जुलै रोजी पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाणार होता. पण कोरोनाच्या शिरकावामुळे आता श्रीलंका दौऱ्याच्या वेळापत्रकात बदल केला आहे. आता पहिला एकदिवसीय सामना 18 जुलैला खेळवला जाणार आहे. श्रीलंका क्रिकेट संघ नुकताच इंग्लंड दौऱ्यावरुन परतला आहे. यावेळी सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी संघाचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर आणि जी. टी. निरोशान यां दोघांची कोरोना टेस्ट पॉजीटिव्ह आली. त्यामुळेच संपूर्ण श्रीलंका संघाला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. सोबतच सुरक्षेचा उपाय म्हणून भारतीय संघालाही विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यासंदर्भात बीसीसीआयने नुकतीच माहिती दिलेली आहे.

असे असेल नवे वेळापत्रक
पहिला एकदिवसीय सामना – 18 जुलै
दुसरा एकदिवसीय सामना –  20 जुलै
तिसरा एकदिवसीय सामना – 23 जुलै
पहिला टी-20 सामना –  25 जुलै
दुसरा टी-20 सामना –  27 जुलै
तिसरा टी-20 सामना –  29 जुलै

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा