कोपर्डी घटनेतील नराधमांना फाशी द्या




औरंगाबाद : कोपर्डी येथील अमानुष घटनेला मंगळवारी दि.13 जुलै रोजी पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने मराठा क्रांती मोर्चाने पीडित भगिनीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. कोपर्डी घटनेतील नराधमांना तातडीने फाशी द्या, अशी आग्रही मागणी यावेळी मराठा समन्वयकांकडून करण्यात आली.
पाच वर्षांपूर्वी 13 जुलै 2016 रोजी कोपर्डी येथ एका मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घुण खून करण्यात आला. या अमानुष घटनेने त्यावेळी संपूर्ण देश हादरला होता. या घटनेच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाची स्थापना करून लाखो लोक मूकमोर्चाद्वारे रस्त्यावर उतरले होते. आरोपींना भर चौकात फाशीची शिक्षा देण्याची मागणी त्यावेळी करण्यात आली.
या घटनेला आज पाच वर्ष पूर्ण होत आहेत. तरी गुन्हेगारांना अद्याप फाशीची शिक्षा मिळालेली नाही. याप्र्रकरणी प्रशासन आणि शासन गंभीर नसल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागत आहे. काळीमा फासणार्‍या घटना घडत आहेत. महिलांना विशेष संरक्षण देणे, ही प्रत्येक व्यक्तिची जबाबदारी आहे. आज आम्ही भगिनीला प्रासंगिक श्रद्धांजली देत असलो तरी तिच्या मारेकर्‍यांना फाशी होईल, तोच दिवस खरी श्रद्धांजली देणारा ठरेल, अशी भावना यावेळी मराठा समन्वयकांनी व्यक्‍त केली. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे सतीश वेताळ, मनोज गायके, डॉ. शिवानंद भानुसे,
रमेश गायकवाङ, विजय काकडे, रेखा वहाटूळे, सुकन्या भोसले, मनीषा मराठे, राखी सुरडकर, सुवर्णा तुपे, धनश्री भोसले, वैशाली खोपड़े, अजय गंडे, अंकत चव्हाण, योगेश औताडे, रवी वहाटूळ, विलास औताडे, अनिल तुपे, सुनील कोटकर, रविंद्र काळे, गोडशे पाटिल, भारत कदम, गणेश उगले, राजेश मेटे, दिलीप जाधव, के.के.पाटिल, नीलेश काळे, निवृत्ती मांडकीकर, आदित्य जगदाळे, उमेश सोमवंशी, राजेश धूरट, विकी पाटील, रविंद्र तुपे, संगीता जाधव, सुवर्णा मोहिते, प्रतिभा जरहाड, जयश्री दाभाड़े, सुनील साळुंके, आंकुश थोराथ, दिनेश शिंदे, भोला वहाटूळे, नीलेश शिंदे, अशोक वाघ, परमेश्वर नलावडे आदींची उपस्थिती होती.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा