ताई, तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मामु मोठा चतुर आहे, हे विसरू नका




अकोला : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी मंगळवारी समर्थकांशी मुंबईत संवाद साधताना भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांवक थेट शाब्दिक हल्लाबोल केलेला आहे. त्याची चर्चा आता रंगू लागली असतानाच आता या वादात राष्ट्रादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी उडी मारली आहे. ताई, तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मा.मु. मोठा चतुर आहे, हे विसरू नका, असा सल्ला अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांना दिला आहे.
अमोल मिटकरी यांनी टि्वटकर मुंडे यांना हा सल्ला दिलेला आहे. ट्विटमधून मिटकरी यांनी भाजप नेत्यांवर अप्रत्यक्ष हल्लाही चढवला आहे. ताईंनी आज कौरावांना चांगलंच झोडपलं. ताई, तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मा.मु. मोठा चतुर आहे, हे विसरू नका. या धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवल्या गेलंय. मामु सोबत डोक्याला तेल लावलेले धर्मराज व पोरी पळवून नेणारे दुःशासनपण आहेत. “नरो वा कुंजरोवा होऊ देऊ नका, असे आवाहनही मिटकरी यांनी केले आहे. मिटकरी यांच्या या सल्ला वजा खोचक ट्विटची जोरदार चर्चा होत आहे. त्यावर भाजप नेते काय प्रतिक्रिया देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा