सेंट अँन्स स्कूल म्हणते १६ टक्के ! पालक ५० टक्के सवलती वर ठाम !!




 

शासन आदेश पन्नास टक्के आसताना का ? सवलत दिली जात नाही…पालक आक्रमक भुमिका..

बीड l दि.१४ बीड येथील सेंट अँन्स स्कूल (शाळा) बीड व्यवस्थापक यांनी पत्रकार परिषद घेऊन शाळेने केले कार्य आणि फी संदर्भात दिलेली माहिती पुढील वृत्तान्त सविस्तर आमची शाळा मागील 27 वर्षापासून विद्यादानाचे पवित्र कार्य करीत आहे बीड महामार्ग च्या कालावधीमध्ये आमच्या शाळेने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू ठेवले असे की, ऑनलाईन शिक्षणासाठी आम्ही झूम ॲप चा वापर करतो हे की, हे झूम ॲप मोफत नसून आम्ही अधिकृत रित्या लायसन्स (परवाना )घेऊन कंपनीशी करार करून विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण चालू ठेवले. तसेच शैक्षणिक वर्ष 20 20 – 21 या वर्षामध्ये सर्व वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षा घेऊन शाळेने निकाल तयार केलेला आहे. व शाळेच्या पोर्टल वर प्रदर्शित केला .ऑनलाइन शिक्षणाद्वारे अभ्यासक्रमाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा ,शालेय उपक्रम देखील राबविण्यात आले तसेच एकाही विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित ठेवलेले नाही .ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा महामारी मुळे मृत्यू झालेला आहे .अशा विद्यार्थ्यांचे दहावीपर्यंत संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ केले आहे. शैक्षणिक वर्ष 20 20 – 21 मध्ये १४८२ विद्यार्थ्यांनी अद्याप तीस भरलेले नाही. आमची शाळा शैक्षणिक कार्याबरोबरच समाज सेवेचे कार्य शुद्ध करते .जसे की ,वैद्यकीय मदत, गरीब व गरजवांतना निवारा उपलब्ध करून देणे .शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी दोन शैक्षणिक केंद्र उभारलेली आहेत. त्यांना पूर्णपणे मोफत शिक्षण आहे. तसेच बीड जिल्ह्यातील अनाथ आश्रम वर्धा आश्रम जसे की, इन्फंट संस्था, बालग्राम, आदिवासी समीकरण सेवाश्रम ब्रम्हनाथ, येळम ब्रहानपूर येथे जलयुक्त शिवार शाळेतर्फे राबवून आर्थिक मदत दिली. आपल्या शाळेसमोर आर्थिक समस्या निर्माण झालेली असल्यामुळे शिक्षकांचे पगार व ऑनलाइन शिक्षणासाठी वापरत असलेल्या झूम कंपनीचे शुल्क देण्यासाठी देखील शाळेकडे पैसे नाहीत. शैक्षणिक वर्ष 2017- 18 या शैक्षणिक वर्ष 2020- 21 पर्यंत शैक्षणिक शुल्क भरलेले एकूण विद्यार्थी 1993 आहेत. सरकारी नियमानुसार दर दोन वर्षांनी 15 टक्के फीस वाढवण्याची परवानगी असताना देखील शाळेने मागील चार वर्षापासून शैक्षणिक शुल्कामध्ये वाढ केलेले नाही. आता आम्ही शैक्षणिक शुल्कामध्ये 16 टक्के सवलत दिलेली आहे. त्यामुळे शाळेचे 75 लाख रुपये नुकसान होत आहे. या व्यतिरिक्त आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शाळा 45 लाख रुपये प्रतिवर्ष खर्च करते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये 16 टक्के सवलत दिलेली रक्कम आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च दोन्ही एकत्रित केल्यास एक कोटी 19 लाख 15 हजार 625 रुपये एवढे आर्थिक नुकसान शाळा सहन करत आहे. या व्यतिरिक्त कोविड महामार्गामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबांना शाळेने एक लाख रुपये आर्थिक मदत केलेली आहे. तसेच 16 टक्के फीस मध्ये सवलत दिल्यानंतर पूर्वप्राथमिक वर्गात ची फीस प्रतिमहिना 1062 रुपये प्राथमिक वर्गाची फीस प्रतिमहिना चौदाशे रुपये माध्यमिक वर्गाची ची फीस प्रतिमहिना पंधराशे रुपये तसेच ज्या पालकांना टर्मफिस एक रकमी भरणे शक्य नाही. त्यांच्यासाठी टप्प्याने प्रतिमहा शुल्क भरण्याची सवलत शाळेने दिलेली आहे. पालकांना शाळेने एवढ्या सवलती देऊन सुद्धा पालक वेळेवर फिल्म भरत नाहीत. म्हणून शाळेला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे .आमची शाळा या मुद्द्यावर ठाम आहे की ,शैक्षणिक वर्ष 2020- 21 मध्ये शैक्षणिक शुल्क सवलत देत आहे .आणि शैक्षणिक शुल्कामध्ये 16 टक्के सवलत फक्त कोविंड काळापुरतीच मर्यादित राहील अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये शाळेचे व्यवस्थापक यांनी दिली.

सेट अँन्स स्कूल शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांची प्रतिक्रिया अशी आहे की, जर आमच्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल उपलब्ध नव्हता .शाळा सुरू नव्हत्या तर आम्ही शैक्षणिक फी का भरावी .आम्ही फीस भरणार नाही. शासनाने ती माफ करावी या भूमिकेवर सुद्धा शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक ठाम आहेत. शाळेच्या बाहेर मोठ्याप्रमाणात पालक वर्ग उभा होता . पालकांनी पण प्रतिक्रिया दिल्या.

पालकांचे असे म्हणणे आहे की गेल्या दोन वर्षापासून शाळेला कसल्याही प्रकारचा मेन्टेनन्स नाही, शाळेमध्ये दोन वर्षापासून क्रीडा स्पर्धा किंवा गॅदरिंग झालेली नाही त्यामुळे शाळेने पूर्णपणे फि माफ करावी किंवा मग फि मध्ये ५० टक्के सवलत द्यावी असे पालकांचे म्हणणे आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा