दुचाकी-कारच्या अपघातात एक ठार




 

वडोदबाजार : औरंगाबाद-जळगाव राज्य रस्त्यावर आळंद गावाजवळ कार व दुचाकी च्या झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार ठार झाला असून त्या सोबत असलेला 1 जण व कारमधील 5 जण असे सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. यात सुरेश गंगाराम राऊत (रा.सिसारखेडा ता. सिल्लोड) असे मयताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, औरंगाबाद व बालानगर येथील चांडक परिवार कारने (एमएच14 एफसी 2488) जळगाव येथे एका समारंभासाठी गेले होते. मंगळवारी दुपारनंतर औरंगाबादकडे परत येत असताना आळंद गावाजवळ त्यांची कार व मोटरसायकलला (एमएच 20 डी यु 1846)  जोरात धडकल्याने मोटर सायकलस्वार हवेत फेकल्या गेले. मोटार सायकल स्वार औरंगाबाद येथुन घराकडे चालले होते.
ते पेट्रोल पंपाकडे वळण घेत असताना समोरून येणार्‍या कारने त्यांना उडविले असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. यानंतर कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने सदर कार रोडच्या कडेला जाऊन उलटली. अपघातानंतर कार चालक फरार झाला. या अपघातात दुचाकीवरील सुरेश गंगाराम राऊत (35) आणि गंगाधर धोंडीराम सुरे (36) दोघे. रा. सिसारखेडा ता. सिल्लोड यांच्यासह कारमधील शिवप्रसाद चांडक, संतोष चांडक, शिवबा चांडक, विजया चांडक, श्रीनाथ चांडक हे गंभीर जखमी झाले. जखमींना त्वरित उपचारासाठी औरंगाबाद येथे रुग्णालयात दाखल केले असता सुरेश गंगाराम राऊत यास डॉक्टरांनी मयत घोषित केले. या घटनेची नोंद वडोद बाजार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. जमादार दत्ता मोरे अधिक तपास करीत आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा