23 जुलै पर्यंत शेतकऱ्यांना पीकविमा भरता येणार 




राजेंद्र आमटे यांच्या मागणीला यश ।
बीड । शेतकरी आपल्या पीकाचे नैसर्गिक आपत्ती पासून नुकसान झाल्यास नुकसानभरपाई मिळावी म्हणून दर वर्षी पीक विमा शेतकरी काढत असतो परंतु पीक विमा भरण्याची अंतिम तारीख 15 जुलै होती अनेक शेतकरी पीक विमा भरण्यापासून वंचित होते अनेक शेतकऱ्यांचे पीक विमा अर्ज ऑनलाईन साइड चालत नसल्याने अर्धवट भरलेले होते अनेक शेतकरी पीक विमा भरण्यापासून वंचित होते. पीक विमा भरण्याची तारीख वाढवावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी बीड याना निवेदन देऊन पीक विमा कंपनीच्या कडे पाठपुरावा केला शासन व प्रशासनाने शेतकऱ्यांचा विचार करत शेतकरी पीक विमा भरण्यापासून वंचित राहू नये म्हणून पीक विमा भरण्याची तारीख 15 जुलै वाढवून 23 जुलै केली तरी शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा पीक विमा काढण्यात यावा व कोणीही शेतकरी पीक विमा भरण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे आव्हान  राजेंद्र आमटे, सुहास पाटील,युवा नेते नितीन आगवान,जेष्ठ नेते गोपीनाथ घुमरे,शरद तिपाले,मुकुंद अबुज,दादा घोरड, सुरज बहिर,विजय सुपेकर,आदींच्या वतीने करण्यात येत आहे.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा