पेट्रोल -इंधन दरवाढीचा निषेध- विदयार्थी काँग्रेस




पेट्रोल डिझेल इंधन दरवाढीविरोधात विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबवत केंद्रातील भाजपा सरकारचा निषेध।

बीड । केंद्रातील भाजपा सरकारने पेट्रोल डिझेल इंधन तसेच खाद्य तेल डाळींचे अत्यावश्यक पदार्थांचे भाव
शंभरी पार करून ठेवले आहेत, या दरवाढीविरोधात बीड येथे विद्यार्थी काँग्रेस NSUI चे राष्ट्रीय अध्यक्ष नीरज कुंदन, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अमीरभाई शेख, प्रदेश प्रभारी अमित टिम्मा यांच्या निर्देशानुसार व राष्ट्रीय समन्वयक अक्षय दळवी, बीड जिल्हा विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयदीप राऊत यांच्या नेतृत्वाखाली बॅंक कडे इंधन व खाद्य तेल डाळ खरेदी करण्यासाठी सर्व सामान्य नागरिकांसाठी नवीन कर्ज योजना सुरू करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली, सर्व सामान्य नागरिकांच्या दरवाढीविरोधात असलेल्या तीव्र भावना समजून घेत पेट्रोल पंपावर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली, विद्यार्थी पदाधिकाऱ्या कडून विविध पेट्रोल पंपावर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आलेल्या यादी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब व बीड जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष पापा मोदी साहेब तसेच प्रदेश विद्यार्थी काँग्रेस कडे प्रति पाठविण्यात येणार आहेत, यावेळी बीड जिल्हा विद्यार्थी काँग्रेस जिल्हाउपाध्यक्ष अजिंक्य थोटे, सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष शिवराज शिरसाट, माऊली भागवत, निखिल लाखे, राजन वांघुबरे
आदी पदाधिकारी उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा