घरासमोर, शेतात एक झाड लावून आषाढी एकादशी साजरी करा




घरासमोर, शेतात एक झाड लावून आषाढी एकादशी साजरी करा ।

-ह .भ. प. हरिदास भाऊ जोगदंड

मांजरसुबा । पांडुरंग स्वरुप + झाडाची पूजा हीच आषाढी एकादशी आहे. कोरोनाच्या संकटामुळे वारकरी व सामान्य लोकांना पंढरपूरमध्ये जाऊन पांडुरंगाचे | प्रत्यक्ष दर्शन घेणे यंदा शक्य नाही. त्यामुळे समस्त वारकरी, नागरिकांनी बुधवार दि १ जूलै रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या घरासमोर किंवा शेतात किमान एक झाड लावावे. याच झाडाच्या रुपात पांडुरंगाचे दर्शन घेऊन आषाढी एकादशी साजरी करावी, असे आवाहन अखिल वारकरी मंडळाचे बीड जिल्हाध्यक्ष ह.भ. प. हरिदास जोगदंड यांनी केले आहे.

वारकरी संप्रदायाने नेहमीच जगाच्या कल्याणाचा विचार केला आहे. कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशावेळी पंढरपूरला जाऊन समाजाला अधिक संकटात टाकणे इष्ट होणार नाही, असा उदात्त विचार समस्त वारकरी संप्रदायाने केला आहे. कोरोनामुळे आपल्याला शरीराने वारी करता येणार नसली तरी मनाने प्रत्येकाला वारी करता येणार आहे. यासाठी ठायीच बैसुनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा या संतवचनाचे प्रत्येकाने पालन करावे. घरात बसून हरिपाठ, भजन, पूजन करावे. तसेच घरासमोर किंवा शेतात जाऊन प्रत्येकाने एक झाड लावावे. असे आवाहन केले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा