पाऊले चालती..! पंढरीची वाट..!!




पाऊले चालती पंढरीची वाट |

देवा ह्या कोरोना सारखी महामारी टळुदे ! लवकर तुझ्या भक्ताला येउदे ! तुज्या दारी आम्ही भक्त पहातो तुझ्या चरणाची वाट!

आषाढी एकादशीला पंढरपुरला जी महायात्रा भरते ती यात्रा आणि त्या यात्रेसाठी देहू , आळंदी निघणाऱ्या पालख्या, त्या पालख्यांबरोबर असणारे लाखो भावीक २० ते २२ दिवस प्रवास करून पंढरपुरला पोहचतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावर इतके लांबचे अंतर चालून पंढरपूरच्या वारीला जाणारे वारकरी, कुठलाही शीण नाही, भांडण नाही का गोंधळ नाही. अशा महायात्रेची प्रशासनबरोबर अनेक स्वयंसेवी संस्थाही पुढे येवून सर्वातोपरी सोयीसुविधा पुरवितात. या यात्रनिमित्त टाकलेला हा दृष्टीक्षेप…. अवघ्या महाराष्ट्राचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरपुरकडे लाखो भाविकांची यात्रेसाठी वाटचाल सुरू आहे. या यात्रेसाठी देहू आणि आळंदीवरून तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालख्या घेवून लाखो वारकऱ्यांची पदयात्रा सुमारे २५० किलोमिटरचे आंतर पार करून पंढरपुरला पोहचते. कुठलाही प्रचार, पसार न करता एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक सुमारे २५० किलोमीटर अंतर पंढरीच्या भावभक्तीत तल्लीन होवून पार करतात. त्यामुळे ही जगातली एक अदभूत घटना म्हणून मान्यता पावत आहे. या काळात जगभरातील पर्यटक या घटनेकडे आकर्षीत होताना दिसत आहेत. पंढरपूर आता धार्मीक पर्यटनाच्या आंतरराष्ट्रीय नकाशावर झळकु लागले आहे. ते नाव आता अधिक ठळक करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ आणि महाराष्ट्र आर्थिक विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने प्रयत्न चालू आहेत.

माझे जीवीची आवडी! पंढरपूरा नेईन गुढी !! पांडुरंगी मन रंगले ! गोविंदाचे गुणी वेदले !! जागृत मन स्वप्न सुषुप्त नाठवे ! पाहता रूप आनंद साठवे!!

बाप रुखमा देवीवरु सगुण निर्गुण रूप विटेवरी दाखविली खुण !! पंढरपुरात आषाढी यात्रनिमित्त भक्ती मेळ्यात सामील

होण्याची ओढ लागलेल्या प्रत्येक वारकऱ्यांच्या हयात पंढरपूर असते. जवळ-जवळ २० ते २१ दिवस अगोदर देहूतून तुकोबाची तर आळंदीहून माऊलीची पालखी टाळ मृदगाच्या गजरात पंढरपूरकडे प्रयाण करते. या पालखीबरोबर हजारो वारकरी तल्लीन होवून जातात.

पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडूनीया गाट!! गाजुनी भारी दुःख दारिद्रयाने ! करी ताणताण भाकरीचे ताट !!

घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा ! अशा दारिद्रयाचा होई मनशांत होता पुन्हा लागे ओढ ! दत्ता मांडी गोड

नायनाट !!

आंतराचा ताट!! पाऊले चालती पंढरीची वाट !!

अशी भावना पंढरीच्या या भक्तांची असते. हा भक्तीचा सागर पाहण्यासाठी परदेशातून अनेक उत्साही पर्यटक येतात. हे दृष्य पाहून परदेशी पर्यटकांना पांडुरंगाच्या अगाध महिम्याविषयी कमालीची आकर्षक वाटायला लागते. त्यातुनच कुणी माहितीपट तर कुणी यावर प्रबंध लिहतात. पंढरीच्या पांडुरंगाच्या दारात जातीय भेदाभेद नाही. हा या भागवत पंरपरेचा महिमा आहे. संस्कार आहे. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म ! भेदाभेद भ्रम अमंगळ !! हा थोर सामाजिक विचार १७ व्या शतकात तुकाराम महाराजांनी दिला. तो जातीय स्तरीयकरणावरचा पहिला प्रहार होता.

एक तुळशीची माळ हा भागवत परंपरेला जुळवून घ्यायचा धागा आहे. गळ्यात तुळशीची माळ घातली की एकादशी पंढरीशी हा वारकरी जोडला जातो तो कायमचा. मग पंढरपुर त्याचे माहेर होते. वैज्ञानीक प्रगतीमुळे आपण सतत एकमेकांच्या संपर्कात राहतो. पण पूर्वी एकदा दिंडीसोबत घर सोडले की परत येईपर्यंत रोजच्या सगळ्या विवचनापासून मुक्त होवून दिवसरात्र परमेश्वराचे नामस्मरण आणि संताचा सहवास अशा वेगळ्या सात्विक वातावरणात राहण्याचा एक आगळा वेगळा अनुभव त्यांना मिळत असे. पंढरपुरला जाणाऱ्या अनेक दिंड्या आहेत. पण देहू आणि आळंदीहून निघालेल्या दिंडयाबरोबर प्रचंड मोठा भक्तीसागर सासवड मार्गे पदयात्रा करीत जातो.

या दिर्डीत लाखो लोक भांडण तंटे न करता एकत्र जातात. सर्वांची ओढ फक्त पांडुरंग या नावाभोवती असते. भजन, किर्तन, रिंगण, फेर धरून नाचतात आणि तल्लीन होवून जातात. उच, निवतेचा लवलेश कुठेही नसतो. या गोष्टी परेदशातील ..लोकांना आकर्षित करतात. त्यातुनच दिवसेंदिवस परदेशी लोकांचा ओढा या दिंडीकडेही वाढत चालला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळानेही पंढरपुरला या महायात्रेला प्रमोट करायचे ठरविले आहे.

– ह.भ.प. हरिदास भाऊ जोगदंड उपाध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ बीड जिल्हा

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा