किल्ले धारूर शहरात प्रशासनाची तोंड पाहून कारवाई




कोविड नियम फक्त सर्वसामान्य नागरिक छोटे व्यवसाय यांना लागू पडत असल्याचे चित्र धारूर शहरात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. शहरातील अनेक व्यवसायिक कायद्याचे धिंडवड काढताना दिसत आहेत पण कारवाई मात्र सर्वसामान्य नागरिक छोटे व्यवसाय दिसत आहे.
राज्य शासनाच्या नियमावलीनुसार व्यवसायिकांना सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास मुभा देण्यात आली आहे यानंतर व्यवसाय करणाऱ्यास दंड ठोठावण्याचे आदेश राज्य शासनाने पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन,नगर परिषद प्रशासनाला दिले आहेत. धारूर शहरातील प्रशासन मात्र तोंड बघून कारवाई करत आहे व छोट्या व्यवसायिकांना तसेच तोंड पाहून दंड आकारत आहेत. मोठ्या व्यवसाय का च्या पाठी धारूर पोलिसांचा आर्थिक हात आहे की काय अशी प्रतिक्रिया शहरातील छोट्या व्यावसायिकांच्या तोंडातून येत आहे.

Marathwada patra team

     Date -28 jully 21

किल्ले धारूर । प्रतिनिधी ।
संपूर्ण महाराष्ट्रात लोकडाऊन असल्याकारणाने 4 च्या नंतर संचारबंदी असून केवळ अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्यास त्यानंतर परवानगी आहे. दोन महिन्याचे कडक लॉकडाऊन काही दिवसां आगोदरच संपले व शासनाच्या आदेशानुसार चार वाजेपर्यंत सर्व व्यवसायिकांना व्यवसाय करण्यासाठी मुभा मिळाली आहे याचप्रमाणे धारूरमध्ये ही व्यवसाय चालू आहेत छोटे व्यावसायिकांचे लॉक डाऊन मुळे हाल झाले आहेत. कसाबसा व्यवसाय करू छोटे-मोठे व्यवसाय आपल्या पोटाची खळगी भरत आहेत परंतु प्रशासन मात्र यांच्यावर कारवाई करून छोट्या-मोठ्या व्यावसायिकाने दिवसभर व्यवसाय करून गोळा केलेली रक्कम दंड आकारून त्यांच्याकडून वसूल करून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणीत आहे आधीच लोक डाऊन मुळे या व्यवसाय कर उपासमारीची वेळ आली होती कसाबसा व्यवसाय सुरु तर झाला पण प्रशासन छोट्या व्यावसायिकांना व्यवसाय करू देण्यास तयार नाही मात्र मोठा व्यवसायिकांना प्रशासन जणू काही सूट देत आहे असे चित्र दिसून येत आहे मग एकाला एक न्याय तर दुसऱ्याला दुसरं असं प्रशासन करताना दिसत आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा