रंकाळा ग्रुपने दिला पुरग्रस्तांना मदतीचा हात




  सढळ हाताने मदतीचे आवाहन l

बीड  l कोकण-कोल्हापूर भागात अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्यांच्या मदतीसाठी रंकाळा ग्रुपच्या वतीने ३० हजार रूपयांची बिस्किटे स्व:निधीतून पाठविण्यात आले . ज्यांना शक्य आहे त्यांनी ‘तुम्ही-आम्ही बिडकर’कडे मदत पोहच करावी, असे आवाहन रंकाळा ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.

कोकण, कोल्हापूर भागात पावसाने हाहाकार केला असून लोकांच्या घरात पाणी शिरलेले आहे. परिणामी तेथील जनजिवन विस्कळीत झाले असून त्यांना मदतीची आज गरज आहे. हीच गरज ओळखूण माणूसकीच्या नात्याने येथील रंकाळा ग्रुपने स्वनिधीतून बिस्किटे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि संबधीत मदत ‘तुम्ही आम्ही बीडकर’ यांच्यावतीने जी मदत जमा करण्यात येत आहे, त्यात दिला. ही मदत तुम्ही आम्ही बीडकर, वाहनाने पुरग्रस्तांना पोहच करणार आहेत. ग्रुपच्या वतीने शक्यती मदत करण्यात आलेली आहे. सन २०१९ मध्ये सांगलीमध्ये महापूर आला होता, त्यावेळी देखील रंकाळा ग्रुपने पुढाकार घेत दोन ट्रक साहित्य सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पोहच केले होते. रंकाळा ग्रुप कायम अडचणीत असलेल्या लोकांना मदत करत आहे. गुरूवारी पुरग्रस्तांसाठी मदत पाठविण्यात आली. यावेळी कारागृह अधिक्षक विलास भोईटे, जि.प.सदस्य ॲड.प्रकाश कवठेकर, सभापती बळीराम गवते, विजय लाटे, रतन बहिर, शिवाजी शिंदे, लक्ष्मण बारगजे, प्रशांत उगले, दत्ता काकडे, संदीप लवांडे आदि उपस्थित होते.

कोकण, कोल्हापूर भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजिवण विस्कळीत झाले असून त्याचे व्हिडीओ पाहून तेथील परिस्थतीचे गांभिर्य लक्षात येते. त्याठिकाणी मदतीची आवश्यकता आहे. यामुळे शक्य ती मदत करण्यात आली आहे. सर्वांनीच माणूसकी म्हणून मदत करावी.

 

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा