श्री साईराम अर्बन बँकेकडून रणदिवे ऋषीकेश  यांच्या वारसाला आर्थिक मदत




श्री साईराम अर्बन बँकेकडून रणदिवे ऋषीकेश  यांच्या वारसाला 11,000/- ची आर्थिक मदत
दै. मराठवाडा पत्र टीम
दि. 06 ऑगस्ट 2021
आर्थिक मदतीचा चेक वितरण करतांना सर्व कर्मचारी
साईराम बँकेचा स्तुत्य उपक्रम 
    बीड।   ईटकूर ता. कळंब येथील रहिवाशी असलेले श्री साईराम अर्बन बँकेच्या कळंब शाखेचे खातेदार , रणदिवे ऋषिकेश माणिकराव यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले श्री साईराम अर्बन बँकेचे अध्यक्ष मा. शाहिनाथ विक्रमराव परभणे यांनी बँकेच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना 11,000/- आर्थिक मदत केली.
मयताचे वारस पत्नी रणदिवे जयश्री  यांच्याकडे 11,000/- आर्थिक मदतीचा धनादेश कळंब नगरअध्यक्षा मा. सुवर्णा ताई मुंडे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी  कळंब शाखेचे शाखाव्यवस्थापक एन. जे. भिसे. कर्मचारी ए. एस. बेलगावकर, पि. एम. जगताप, आर. यु.जाधव, व्ही. बि. कांबळे, पिग्मी एजंट ए. एन. मंडाळे, एम. एस. चिरके आदी उपस्थित होते.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा