पिंपळनेरच्या मुस्लिम बांधवाकडून पूरग्रस्तांना मदत; जमिअत उलमा चा उपक्रम सलोखा टिकवणारा आहे-अशोक होळकर




 

पिंपळनेरच्या मुस्लिम बांधवाकडून पूरग्रस्तांना मदत

जमिअत उलमा चा उपक्रम सलोखा टिकवणारा आहे-अशोक होळकर

पिंपळनेर। जमीअत उलमा च्या पुढाकाराने पिंपळनेर येथील मुस्लिम बांधवानी पूरग्रस्तांना मदत जमा केली असून ही मदत सलोख्याची मदत आहे नेहमीच मुस्लिम बांधवानी सामाजिक कार्यात हातभार लावलेला असून या वेळी देखील संकटकाळी सामाजिक बांधिलकी म्हणून अन्नधान्य कपडे संकलित करून पूरग्रस्तांना ही मदत पाठवण्यात आली जमिअत उलमाने नेहमी सलोखा कायम ठेवण्याचे काम केले आहे खरोखरच हे कार्य नक्कीच सर्वांसाठी आदर्श असल्याचे बीड प्रहारचे संपादक अशोक होळकर यांनी म्हटले आहे .

ज्या ज्या वेळी देशात कोणतेही संकट आले कोणती आपत्ती अली तर जमिअत उलमा ने पुढाकार घेऊन संकटात हातभार लावून सामाजिक बांधिलकी जपली आहे कोल्हापूर ,चिपळूण महाड सारख्या ठिकाणी महापुराची भयानक परिस्थिती निर्माण झाली अनेक कुटुंब उध्वस्त झाले जे आहेत त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे ,म्हणून पिंपळनेर येथील मुस्लिम बांधवानी पुढाकार घेऊन अन्नधान्य ,कपडे आणि नगदी स्वरूपात दहा हजाराची मदत जमा करून सामाजिक बांधिलकी जपली आहे सदरील मदत ही मंगळवार रोजी दुपारी पत्रकार अशोक होळकर व मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित लोकांच्या उपस्थितीत पाठवण्यात आली यावेळी जमिअत उलमा पिंपलनेर ता जि बीड चे मौलाना आसेफ कुरेशी,मौलाना शकील , हाफीज ईमाम ,हाफीज मुजाहिद ,अब्दुर्रहीम कुरेशी नीसार भाई अतार, खालेद भाई चाउस, कालु भाई पठान , मुजीब भाई अतार,इस्माईल कुरेशी, यांची उपस्थिती होती.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा