जिल्हाध्यक्ष राजेन्द्र मस्के,डिवाय एसपी वाळके यांच्या मध्यस्थीने दिपक थोरात यांचे उपोषण मागे




जिल्हाध्यक्ष राजेन्द्र मस्के,डिवाय एसपी वाळके यांच्या मध्यस्थीने दिपक थोरात यांचे उपोषण मागे

 बीड ।
जिल्हा रुग्णालयातील रेमडेसिव्हर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणी दिपक थोरात यांनी काल पासून जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरु केले ह़ोते. आज भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांचेशी दिपक थोरात यांचा संवाद करून दिला.डिवाय एसपी वाळके यांच्या आश्वासनानंतर दिपक थोरात यांनी अमरण उपोषण मागे घेतले. यावेळी स्वप्निल गलधर,भगीरथ बियाणी,शांतीनाथ डोरले,हरीश खाडे आदी उपस्थित होते.
दिपक थोरात यांचे जिल्हा रुग्णालयातील रेमडिसिव्हर इंजेक्शन काळाबाजार प्रकरणी तक्रार अर्ज दाखल केला होता.
 या अर्जावर बीड पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.
म्हणून बीड जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर पाच ऑगस्ट रोजी आमरण उपोषणास बसले होते.कोरोना काळातील महामारी मध्ये दीप हॉस्पिटल च्या लेटरहेडवर सेतु हातागळे अशा नावाने चार रेमंडेव्हिसर इंजेक्शन गेले होते. सदरील व्यक्ती अस्तित्वात नसताना बनावट नावाच्या आधारे इंजेक्शन दिले. या सर्व प्रक्रियेत तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक सूर्यकांत गीते, सुखदेव राठोड,औषध भांडार प्रमुख आदिनाथ मुंडे, व नितीन चव्हाण नामक व्यक्ती इंजेक्शन घेऊन गेल्याच्या नोंदी दिसून आल्या.
  औषध भांडार आदिनाथ मुंडे यांना सहीचे अधिकार नसतानाही त्यांनी इंजेक्शन दिले.
हा गैरप्रकार समोर येवूनही बीड शहर पोलिसांनी दुर्लक्ष केले. संबंधित गैरप्रकार करणारांना पाठीशी घालण्याचे काम केले.रेमडिसिव्हर काळ्याबाजारामुळे लोकांना जीव गमवावा लागला.हा काळाबाजार बाहेर काढण्यासाठी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून दिपक थोरात यांनी कित्येक निवेदन जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक बीड शहर पोलीस स्टेशन जिल्हा आरोग्य अधिकारी बीड जिल्हा रुग्णालय तसेच लातूर उपसंचालक आरोग्य विभाग यांनाही दिले.परंतु कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. म्हणून दीपक थोरात उपोषणास बसले होते. तीन दिवस अन्न पाणी वर्ज्य करूनआमरण उपोषण केले. खा.प्रीतमताई मुंडे यांच्या आदेशानुसार हे उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के साहेब यांनी डीवायएसपी श्री वाळके यांच्याशी चर्चा करून दिपक थोरात यांना जल देवून उपोषण तोडले.
श्री वाळके यांनी सांगितले की दोषींवर नक्कीच कारवाई होईल जे आरोपी असतील त त्यांच्यावर योग्य पद्धतीने गुन्हे दाखल केले जातील व आम्ही या प्रकरणाचा तपास सखोल पणे करू. लिखित स्वरूपात लिहून दिले की सदर प्रकरणी आम्ही पूर्णपणे माहिती सर्व स्तरावरून प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून आम्ही हे प्रकरण हाताळू. प्रकरण निकाली न काढता चौकशी करून या प्रकरणामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील. उपोषण सोडताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के श्री वाळके साहेब डीवायएसपी एपीआय शेख बीड शहर पोलीस स्टेशन भगीरथ बियाणी स्वप्निल गलधर हरिश खाडे हरीश खाडे शांतीनाथ डोरले भगीरथ बियाणी स्वप्निल घाणेकर सोहेल शेख आजीम आकाश घोरपडे व अन्य उपस्थित होते.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा