कृषी विभागामार्फत रानभाजी महोत्सव उत्साहात साजरा




कृषी विभागामार्फत रानभाजी महोत्सव उत्साहात साजरा

वडवणी । प्रतिनिधी – दिनांक ९ ऑगस्टरोजी आदिवासी दिनानिमित्त राणभाजी महोत्सव हा गेल्या वर्षी पासून कृषी विभाग,आत्मा यांच्या मार्फत साजरा केला जात आहे,त्या अनुषंगाने वडवणी तालुक्यातील राणभाजी महोत्सव सोमवार ९ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला, आजच्या राणभाजी महोत्सव निमित्त विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली होती,त्यामध्ये पंचायत समिती सभापती मा.सौ .अंजनाबाई आजबे,तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासक मा.दिनेश मस्के, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती दिनकर आंधळे ,तालुका कृषी अधिकारी उद्धव गर्जे,मंडळ कृषी अधिकारी एस.के.बांगर उपस्थित होते, राणभाजी महोत्सवाचे शुभारंभ पंचायत समिती सभापती मा.सौ .अंजनाबाई आजबे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासक मा.दिनेश मस्के,कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती दिनकर आंधळे यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच तालुका कृषी अधिकारी यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले,आणि राणभाजी महोत्सव घेण्यामागचे उदिष्ट सांगितले.मान्यवरांनी राणभाजी बद्दल महत्व आणि फायदा सांगितला .रानभाज्या संकलित करून त्या कश्या प्रकारे बनवतात व त्या आरोग्यासाठी कश्या महत्व पूर्ण आहेत या विषयी माहिती सुदर्शन आंधळे यांनी सांगितली व कार्यक्रमासाठी (सर्व कृषि सहाय्यक) सौ.मीरा पायके,संदीप भुजबळ ,युवराज पवार ,किशोर नवले,विलास तांबडे यांनी सहकार्य केले,रानभाज्या मध्ये पथरी,गुळवेल,केणा,टाकला,दिंदा, कुडा,पानाचा ओवा,कपाळ फोडी,भुई आवली,मायाळू,शेवगा, कवट,अश्या विविध ३० प्रकारच्या रानभाज्यांचे स्टोल लावण्यात आले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृ.स.श्री गणेश बडे यांनी केले,तर आभार प्रदर्शन श्री कार्तिक पेटकर यांनी केले,कार्यक्रमास वडवणी शहरातील नागरिक व परिसरातील शेतकरी,तसेच कृषी विभागाचे अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा