महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक आऊटसोर्सिंग युनियनची तालुका व जिल्हा कार्यकारणी जाहीर




 

महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक आऊटसोर्सिंग युनियनची तालुका व जिल्हा कार्यकारणी जाहीर

दौलावडगाव । प्रतिनिधी – मागील अनेक दिवसापासून कोणत्याही संघटनेशी संलग्न नसलेल्या, आऊटसोर्सिंग कामगारांनी,त्याच्या न्याय हक्कासाठी व अन्यायविरुध्दचा आवाज बुलंद करण्यासाठी नुकताच ,आष्टी तालुका व बीड जिल्ह्याची कार्यकारणी, वरिष्ठ वीज तांत्रिक कामगार युनियनचे अध्यक्ष, भाऊसाहेब निंबाळकर जिल्हा कार्याध्यक्ष, नितीन खिळे जिल्हा अध्यक्ष, प्रशांत पोकळे.जिल्हा उपाध्यक्ष,विठ्ठल शेंबडे.तालुका अध्यक्ष,अमृतराजे आजबे,तालुका सचिव,शिवाजी गोरे उपाध्यक्ष,सोमा शिंदे, संघटक हमीद सय्यद यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
यामध्ये जिल्हा व तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. बीड जिल्हा आऊटसोर्सिंग कार्यकारणीत जिल्हा प्रमुख,किशोर सापते. उपप्रमुख राजेंद्र डांभे. सचिवपदी सय्यद बाशिद तर वीज तांत्रिक कामगार आणि आऊटसोर्सिंग कामगार अशा दोन्ही युनियनच्या संयुक्त जिल्हा प्रसिद्धी प्रमुख,अर्जुन थोरात. यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली.निवडीबद्दल समाधान आणि आंनद व्यक्त करत अर्जुन थोरात यांचा दौलावडगाव येथे माजी सभापती अशोक इथापे, माजी सरपंच, संदीप रामगुडे, विलास वायभासे ग्रा.सदस्य गोटीराम कोहोक , मुख्याध्यापक सुभाष कोहोक, रवी कदम, केशव कराळे जावेद सय्यद , शांतीलाल कोहोक, शिवाजी परभणे मोशीम कुरेशी,आसाराम कोहोक अंकुश गव्हाणे आदी ग्रामस्थांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
त्यासोबत आष्टी तालुका कार्यकारणीत अध्यक्ष,मनोज निंबाळकर उपाध्यक्ष, संदीप गदादे,राजु काकडे. सचिव, संदीप राऊत सह इतरांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.या झालेल्या निवडीने तालुक्यातील व जिल्ह्यातील कामगारामध्ये आनंद व उत्साह संचारला असून या संघटनेच्या माध्यमातून विविध प्रश्न आता लवकर मार्गी लागतील अशी आशा कामगार वर्गात पल्लवीत झाल्या आहेत. यावेळी, कामगारांचे असणारे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू, तुम्हाला वेळोवेळी पाठबळ देऊ अशी ग्वाही प्रशांत पोकळे, अमृतराजे आजबे यांनी दिली. या प्रसंगी नवं नियुक्ती नवनियुक्त पदाधिकार्यांचे सत्कार करत जिल्हा अध्यक्ष किशोर सापते.यांनी सर्वांचे आभार मानले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा