अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद काव्यसंमेलन उत्साहात संपन्न




अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे, मुंबई प्रदेश, उत्तर मुंबई विभाग आयोजित प्रथम मैत्रोत्सव ऑनलाईन काव्यसंमेलन उत्साहात संपन्न!

पुणे । अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे, मुंबई प्रदेश, उत्तर मुंबई विभाग आयोजित प्रथम मैत्रोत्सव ऑनलाईन काव्यसंमेलन उत्तर मुंबई कार्यकारिणीने आयोजित केले होते. जागतिक मैत्री दिनाचे (१ऑगस्ट २०२१) औचित्य साधून दिनांक ३ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत कव्यसंमेलन संपन्न झाले. काव्यसंमेलनासाठी मुंबई प्रदेशाध्यक्षा हिरकणी राजश्री बोहरा संमेलनाध्यक्षा म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्षा सौ गीतांजली वाणी यांनी केले.
संमेलनाध्यक्ष प्रोत्साहनपर मोलाचे मार्गदर्शन मुंबई प्रदेशाध्यक्षा राजश्रीताई बोहरा ह्यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले की मैत्रोत्सव ही संकल्पना मुळातच मैत्री करणारी..असेच उत्साही उपक्रम/ कार्यक्रम राबवून साहित्यिक मनाला प्रेरणा तर मिळतेच पण विचारांची देवाण घेवाण होऊन सामाजिक प्रबोधनसुध्दा होते. त्यांनी प्रबोधनात्मक स्वरचित गुलाम रचना सादर करून काव्यसंमेलनाचा प्रारंभ केला. उपाध्यक्षा सौ योगिता तकतराव यांनी मैत्रीचे विविध किस्से सांगितले. सचिव सौ कल्पना पाटकर, सरचिटणीस सौ राखी जोशी दोघींनी उत्कृष्ठ निवेदन केले; कार्याध्यक्ष श्रीविठ्ठल घाडी यांनी साध्या शब्दात मैत्ररूपी नात्याचे आयुष्यात असणारे महत्व सांगितले आणि अशाच नाविन्यपूर्ण संकल्पना विविध उपक्रमातुन राबवल्या जातील असेही सांगितले. कवयित्री सौ शोभा कोठावदे यांनी संस्कृत श्लोक सादर केला. एकूण तीस सारस्वतांनी प्रेम, विश्वास, नाते अशा मैत्रीशी संबधीत असणाऱ्या विषयावर सुरेख रचना काव्याच्या विविध प्रकारात सादर केल्या. काव्यसंमेलनासाठी महाराष्ट्रातील विविध भागातून कवी/कवयित्री वत्सला पवार, रेखा येळंबकर, शबाना मुल्ला, राजश्री भावार्थी, मयूर पालकर, रंजना बोरा, यशवंत पगारे, अलका येवले, उषाश्री बागडे, श्वेता नाईक, ज्योती देशपांडे, सपना भामरे, योगेश कानडे, अपर्णा कुळकर्णी, सुरेखा कुळकर्णी, रंजना पोटे, मोहना टिपणीस, श्रुती दिवाडकर, शोभा कोठठावदे, प्रतिभा जाधव, राजश्री विभुते, अश्विनी मेहता, स्मिता किडीले, मिनल बधान, भारती झिमरे, निशा गोडसे, उषा कांबळे, मानसी जामसंडेकर सहभागी झाले होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा