पंतप्रधान मोदी सरकारतर्फे आता स्थलांतरित मजुरांना एलपीजी कनेक्शन मिळण्यासाठी दिलासा – भीमसेन धोंडे




लाभार्थ्यांना एलपीजी कनेक्शन केवळ मोफतच मिळणार नाही तर त्यांना पहिले रिफिल आणि हॉटप्लेटही मोफत मिळणार

Dainik Marathwada Patra Team

Date- 11 August 2021

आष्टी l भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील महोबा येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एलपीजी कनेक्शन सोपवून उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एलपीजी कनेक्शन केवळ मोफतच मिळणार नाही तर त्यांना पहिले रिफिल आणि हॉटप्लेटही मोफत मिळणार आहे. या योजनेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन भाजपचे नेते मा.आ.भीमसेन धोंडे यांनी केले आहे.
केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी म्हणाले की, स्थलांतरितांना रेशन कार्ड किंवा कोणताही रहिवाशी पुरावा सादर करण्याची आवश्यकता असणार नाही. यासाठी स्वत:चे घोषणापत्र पुरेसे मानले जाईल. या योजनेचा शुभारंभ झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी लाभार्थ्यांशी संवाद देखील साधला. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री हरदीपसिंह पुरी म्हणाले की, उज्ज्वला २.० योजनेमध्ये पंतप्रधान उज्ज्वला दुसऱ्या भागात अशा स्थलांतरित मजुरांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. जे यापूर्वी रहिवासी प्रमाणपत्रा अभावी या योजनेपासून वंचित होते. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात आता स्थलांतरित मजुरांना एलपीजी कनेक्शन मिळण्यासाठी दिलासा देण्यात आला आहे. बीपीएल कार्डधारक कोणतीही महिला उज्ज्वला योजनाचा लाभ घेऊ शकते. जवळच्या एलपीजी सेंटरमध्ये अर्ज, केवायसी फॉर्म
भरावा लागेल. अर्ज भरण्यासाठी नाव, पत्ता, जन धन बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक आदि आवश्यक कागदपत्रे आहेत. पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या वेबसाइटवरून आपण पीएमयुवायचा अर्ज डाउनलोड करू शकता. सवलतीच्या दरात स्वयंपाकाचा एलपीजी गॅस देणारी योजना दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिलेच्या नावे मिळतो लाभ, सरकार १६०० रू. अनुदान देते तर तेल कंपन्या १६०० रुपये ग्राहकांना कर्ज स्वरूपात देतात. १४.२ किलोचे पहिले सहा सिलिंडर ईएमआय फ्री असून सातव्या सिलिंडरपासून ईएमआयची सुरुवात होईल. अर्जदाराकडे बीपीएल रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्डची प्रत, राष्ट्रीय बँकेत बचत खाते असणे बंधनकारक आहे असेही या योजनेबाबत माहिती देताना मा.आ.भीमसेन धोंडे म्हणाले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा