२०२० चा पिक विम्या प्रश्नी आ. मुंदडांना किसान सभेचे निवेदन




२०२० चा पिक विम्या प्रश्नी आ. मुंदडांना किसान सभेचे निवेदन
अंबाजोगाई (प्रतिनीधी) बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा  २०२० चा खरीप पिकविमा विमा देण्यास कंपनीस भाग पाडावे व हा प्रश्न विधिमंडळात मांडावा या मागणीचे निवेदन दि. १० ऑगस्ट रोजी आ. नमिता मुंदडा यांना अखील भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्षात भेट घेवून दिले.
सन 2020 खरीप हंगामात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या सर्व पिकांसाठी विक्रमी विमा संरक्षण घेतले होते. या वेळी हंगामा अखेरीस सातत्याने झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही शेतकऱ्यांना अद्याप विमा कंपनीने नुकसान भरपाई दिलेली नाही. अतिवृष्टीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील पीक विमा धारक शेतकरी पीक विम्या पासून वंचित राहत असतील अन् शासन मात्र बीड जिल्हा पीकविमा पॅटर्न शेतकरी हीताचा आहे. असे सांगून तो राज्य व राष्ट्रव्यापी व्हावा असे शिफारश करत असेल तर विधानमंडळाच्या पटलावर याची समीक्षा होऊन हे धोरण खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या हिताचेच आहे हे जिल्हातील उर्वरित सर्व नुकसानग्रस्त शेतकन्यांना पीकविमा वाटप करुन सिद्ध करावे. यामूळे राज्यातील इतर शेतकऱ्यांना ही योजना विश्वासहार्य वाटू लागेल. विमा कंपनीने विमा प्रावधानातील पळवाट पुढे करून, अव्यवहार्य सबबी आड शेतकन्यांना नुकसान भरपाई पासून वंचित ठेवने न्यायोचित नाही . म्हणून 2020 च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या सर्व पीक नुकसानीचे शासनाच्या महसूल विभागाने केलेले पीक पंचनामे गृहीत धरून बीड जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोणत्याही अटी शर्ती शिवाय सरसकट पीकविमा देण्यात यावा. व प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना जाचक ठरणाऱ्या अव्यवहार्य अटी शर्तीचा फेरविचार व्हावा. या साठी आपण आपल्या परीने शक्य ते सर्व सहकार्य करुन विधीमंडळात आवाज उठवावे. आम्ही रस्त्यावर ही लढाई लढून दायित्व निभावतो आहोत , लोकप्रतिनिधी म्हणून आपणही विधान पटलावर हे प्रश्न ऐरणीवर आणून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा या मागणीचे निवेदन अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने दि. १० ऑगस्ट रोजा केज विधानसभेच्या आ. नमिता मुंदडा यांना देण्यात आले. या शिष्टमंडळात कॉ. घाडगे पी.एस, कॉ. नागरगोजे मुरलीधर, कॉ. दत्ता डाके, कॉ. पाडूरंग राठोड, कॉ. अजय बुरांडे, कॉ.शेख खयुम यांचा समावेश होता.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा