न्यू व्हिजन पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सीबीएसई बारावी परीक्षेत यश




न्यू व्हिजन पब्लिक स्कूल १२ वीचा १०० टक्के निकाल
अंबाजोगाई (प्रतिनिधी) केंद्रिय शिक्षण मंडळ अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन तर्फे मार्च-२०२१ महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर झाला.त्यात येथील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू व्हिजन पब्लिक स्कूल अँड सिनिअर सेकंडरीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावी सी.बी.एस.ई.बोर्ड (इंग्रजी माध्यम) परीक्षेत पहिल्याच वर्षी सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने १०० टक्के निकाल लागला आहे.विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या घवघवीत यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या  सी.बी.एस.ई.बोर्ड इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण देणाऱ्या या शाळेतील १२ वी वर्गाच्या विद्यार्थ्यांनी मार्च-२०२१ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत संस्थेचे सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.घवघवीत यश संपादन करून या सर्व विद्यार्थ्यांनी पहिल्याच वर्षी गुणवत्तेत नवा उच्चांक निर्माण करून पुन्हा एकदा अंबाजोगाईचे नांव शैक्षणिक क्षेञात उंचावले आहे.बीड जिल्ह्यात या शाळेच्या ५ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले.८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेणारे २५ विद्यार्थी आणि उर्वरित सर्व विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.अंबाजोगाई तालुक्यातून आणि संस्थेतून प्रथम येण्याचा बहुमान जयंत पिसाळ (९४ टक्के) या विद्यार्थ्याने पटकावला.तर प्रतिक राठोड या विद्यार्थ्याने (९२.८ टक्के) गुण मिळवून शाळेतून द्वितीय,सायली चोकडा या विद्यार्थीनीने (९१.४ टक्के) गुण मिळवून शाळेतून तृतीय,आदित्य जाधव या विद्यार्थ्याने (९० टक्के) गुण मिळवून शाळेतून चौथा आणि तनिष्क बिराजदार या विद्यार्थ्याने (८९.६ टक्के) मिळवून शाळेतून पाचवा क्रमांक प्राप्त करून सदरील विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी,मार्गदर्शक प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी,डॉ.डी.एच.थोरात,प्रा.वसंतराव चव्हाण,संस्थेचे अध्यक्ष भुषण मोदी,संस्थेचे कार्यकारी संचालक संकेत मोदी,शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी,प्राचार्य प्रविण शेळके,उपप्राचार्य वैभव पोतदार सर्व शिक्षकवृंद आदिंनी अभिनंदन करून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.कोविड काळात न्यु व्हिजन पब्लिक स्कूलने विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी विकसित केलेल्या स्वतंत्र ॲपद्वारे ऑनलाईन दर्जेदार शिक्षण दिले.एमएचसीईटी, नीट,जेईई या परीक्षांची तयारी करून घेतली जाते,याशिवाय नियमित अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांमध्ये २१ व्या शतकात उपयोगी पडतील अशी कौशल्ये जसे की,रोबोटिक्स,थ्री डी पेटींग,ब्लॉक कोडींग,कृञिम बुध्दीमत्ता या विषयीच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते.सरकारने जाहीर केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी लगेचच व प्रत्यक्षात सुरू करणारी न्यु व्हिजन पब्लिक स्कूल अंबाजोगाईतील पहिली शाळा ठरली आहे.शाळेने नेहमीच कोविड नियमांचे पालन करून गुणवत्तापूर्ण शिक्षण व विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्यावर भर दिला आहे.आज शाळेचे माजी विद्यार्थी हे देशात व परदेशात आज विविध क्षेत्रात यशस्वी करीअर करीत आहेत.
न्यु व्हिजन पब्लिक स्कुल मधून एमएचसीईटी,नीट,जेईई या परीक्षांची तयारी करून घेतली जाते-संकेत मोदी
अंबाजोगाईत मुंबई,पुणे,नागपुर व औरंगाबादच्या धर्तीवर इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण देण्यासाठी न्यू व्हिजन पब्लिक स्कूल सुरू केले.दहावी परीक्षेत सतत दहा वर्षे १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवून संस्थेने गुणवत्ता जोपासली आहे.आज या संस्थेचे माजी विद्यार्थी हे देशात व परदेशात मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत.संस्थेने ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत शैक्षणिक क्षेञात “अंबाजोगाई पॅटर्न” निर्माण केला आहे.येथे नर्सरी., एल.के.जी.,यु.के.जी.,पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण दिले जाते.अनुभवी व समर्पित शिक्षकवृंद,विद्यार्थ्यांचा सर्वांगिण व्यक्तिमत्व विकास, सुसज्ज ग्रंथालय,ऑडिओ व्हिज्युअल क्लासरूम, अत्याधुनिक प्रयोगशाळा, वायफाय परिसर,भाषा विषयक प्रयोगशाळा,गणित व विज्ञान प्रयोगशाळा, ई-लर्निंगद्वारे प्रशिक्षण,प्रत्येक वर्गात सिसिटीव्ही कॅमेरा,कला, हस्तकला,नृत्य,संगीत,कराटे प्रशिक्षण,पुर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी आद्ययावत इमारत बास्केटबॉल ग्राउंड,प्रशस्त क्रिडांगण,स्पर्धा परीक्षेसाठी स्वतंञ वर्ग या सोबतच सुसज्ज वसतीगृह, प्रत्येक खोलीत प्रसाधनगृह,प्रत्येक खोलीत चार विद्यार्थी, संतुलित व पोषक आहार,दैनंदिन योगा आणि व्यायाम.सकाळी व संध्याकाळी अभ्यासवर्ग,अनुभवी व काळजीवाहक कर्मचारी वृंद, लाँड्री सुविधा,मुलींसाठी स्वतंञ सुविधा,२४ तास वैद्यकिय व विद्युत सुविधा यासोबतच विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावेत,स्पर्धेत विद्यार्थी यशस्वी झाला पाहिजे याकरीता जे-जे करता येईल ते सर्वच सर्वोत्कृष्ट देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सांगून संस्थेने सीबीएसई ११ वी व १२ वी विज्ञान वर्ग सुरू केले आहेत.अंबाजोगाईत पहिले सीबीएसई काॅलेज म्हणून न्यु व्हिजन पब्लिक सिनियर सेकन्डरी स्कूल ओळखले जात आहे.या ठिकाणी एमएचसीईटी,नीट,जेईई या परीक्षांची तयारी करून घेतली जाते,अंबाजोगाईतील विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई ११ वी विज्ञान वर्ग सुरू केले आहेत अशी माहिती संस्थेचे कार्यकारी संचालक संकेत राजकिशोर मोदी यांनी दिली आहे.ज्या विद्यार्थांना ११ वी विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावयाचा आहे.त्यांनी कृपया अधिक माहितीसाठी व प्रवेशासाठी श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू व्हिजन पब्लिक स्कूल,मोदी लर्निंग सेंटर,रिंग रोड,अंबाजोगाई,जि.बीड
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा