खाकीतील चाणक्य दक्ष पोलिस निरीक्षक भारत राऊत यांची मुंबई एसीबीमध्ये बदली




खाकीतील चाणक्य दक्ष पोलिस निरीक्षक भारत राऊत यांची मुंबई एसीबीमध्ये बदली

बीड । दि 15 खाकीमध्ये असे अनेक अधिकारी आहेत. जे की, त्या अधिकाऱ्यांना पोलिस विभाग कधीच विसरणार नाही . कारण त्यांच्याकडील चाणक्य पणामुळे मोठ्या- मोठ्या गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यास खाकीला सातत्याने यश आलेले आहे. आणि येणाऱ्या काळतही येणार आहे . बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारत राऊत हेही तपास कामात चाणक्य आहेत . त्यांच्यामुळे बीड जिल्ह्या पोलिस दलाला अनेक गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यास खऱ्या अर्थाने यश आले आहे . पोलिस खात्यामध्ये आल्यापासून त्यांनी आपले प्रत्येक काम धडाडीने आणि चोखपणे केलेले आहे . त्यामुळेच त्यांच्या कामाचा नेहमीच वरिष्ठांनी गौरवही केलेला आहे .भारत राऊत यांनी यापुर्वी बीडच्या दरोडा पथकातही मोठी भुमिका बजावलेली आहे . बीडबरोबरच त्यांनी उस्माणाबाद याही ठिकाणी कर्तव्य बजावलेले आहे . त्यांचे कामच असे आहे की बीड जिल्हा त्यांची कार्यकिर्द कधीच विसरू शकणार नाही . कालावधी पुर्ण झाल्यामुळे त्यांनी बदलीसाठी विनंती केली होती , त्यानुसार त्यांची बदली मुंबई एसीबीच्या विभागात झाली आहे .

भारत राऊत साहेबांना पुढील कार्यासाठी दै. मराठवाडा पत्र च्या वतीने खूप खूप शुभेच्छा!💐

बीड जिल्ह्यामध्ये  त्यांच्या कार्यकाळामध्ये गुन्हेगारीला आळा बसल्याने जड अंतकरणाने त्यांना निरोप समारंभ देण्यात येत आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा