शिंदे वस्तिकरांचे जलसमाधी आंदोलन, लेखी आश्वासनानंतर तुर्तास स्थगित;महिला आक्रमक तहसिलदार, गटविकास आधिका-यांना धारेवर धरले




 

पाटोदा । तालुक्यातील सौताडा ग्रामपंचायत अंतर्गत शिंदेवस्तिवरील ग्रामस्थांनी गेल्या 20 वर्षापासून चप्पुवरून जिवघेणा प्रवासाला कंटाळुन विविध निवेदने, धरणे आंदोलन, रास्ता रोको, विभागीय आयुक्त औरंगाबाद कार्यालयासमोर आंदोलनानंतर सुधारणा न झाल्याने अखेर सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी रामेश्वर साठवण तलावात ग्रामस्थांसह जलसमाधी आंदोलनाचा ईशारा दिला होता, त्यानुसार आज १५ ऑगस्ट रोजी जलसमाधी आंदोलनाच्या पवित्र्यात ग्रामस्थ असताना नायब तहसीलदार सुनिल ढाकणे, गटविकास आधिकारी पी. डी.अनंत्रे ,सपोनि धरणीधर कोळेकर, विस्तार आधिकारी राख बी. एस.जाधव यु, मंडळ आधिकारी महादेव बडे,ग्रामसेवक विठ्ठल राख ,तलाठी संतोष सानप तसेच प्रशांत गायकवाड, उपसरपंच सौताडा, पांडुरंग सानप, गोवर्द्धन सानप माजी सभापती, तारामती शिंदे, वत्सला शिंदे, उषा शिंदे, लता शिंदे, परमेश्वर शिंदे, बाळु शिंदे, आण्णा शिंदे, दत्ता शिंदे आदिनी आक्रमक भुमिका मांडुन आंदोलनात सहभाग घेतला.

महिला आक्रमक-  तहसिलदार, गटविकास आधिका-यांना धारेवर धरले:-तारामती शिंदे, वत्सला शिंदे, उषा शिंदे

गेल्या 20 वर्षापासून आम्ही जिवघेणा प्रवास करत असून ३-४ जणांचा पाण्यात पडुन मृत्यु झालेला आहे, गरोदर महिला, दवाखाना,किराणा यासाठी सौताड्याला जावे लागते, ४ थी पर्यंत वस्तीवर शाळा असून ५ वी ला सौताड्याला जाण्याऐवजी मुलींना शाळा सोडावी लागते. किती दिवस आमचा अंत पाहणार, कधी रस्ता करून देणार अशी संतप्त विचारणा केली.

रस्त्याचा प्रश्न न सुटल्यास तिव्र आंदोलन:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
गेल्यावर्षभरापासुन उपविभागीय आधिकारी कार्यालय पाटोदा, तहसिलदार, जिल्हाधिकारी कार्यालय बीड, यांना निवेदन देऊन धरणे, रास्ता रोको व २ नोव्हेंबर २०२० रोजी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे धरणे आंदोलन करून सुनिल केंद्रेकर विभागीय आयुक्त यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिल्यानंतर आढावा बैठकीत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते, त्यानंतर पर्यायी व्यवस्था महिनाभरातच करण्याचे लेखी आश्वासन नायब तहसीलदार ढाकणे, गटविकास आधिकारी अनंत्रे यांनी दिल्यानंतर साठवण तलावात उतरलेल्या ग्रामस्थांनी आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आल्याचे डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जाहीर करत महिनाभरात प्रश्न न मार्गी लागल्यास तिव्र आंदोलन करण्यात येणार असल्याबद्दल प्रशासनाला कळवले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा