एक महिन्याच्या लेखी आश्‍वासनानंतर जनविकास परिवर्तन आघाडीचे बेमुदत साखळी उपोषण मागे




 

उपजिल्हाधिकारी शरद झाडगे तथा मुख्याधिकारी सचिन देशपांडे यांचे एक महिन्यात कामे पूर्ण करू असे लेखी आश्वासन

केज ।

केज शहरातील विविध समस्या घेऊन जन विकास परिवर्तन आघाडी केज च्या वतीने बेमुदत साखळी उपोषण स्वातंत्र्यदिनी केज नगरपंचायत च्या दालनामध्ये करण्यात आले होते . या साखळी उपोषणास जनविकास परिवर्तन आघाडी चे मा . हरूनभाई इनामदार तथा उपोषणकर्ते राजूभाई इनामदार, अशोक गायकवाड माजिद इनामदार , अजय भांगे यासह असंख्य कार्यकर्ते उपोषणस्थळी उपस्थित होते.

सकाळी ठीक दहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पुष्पहार अर्पण करून साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली .या साखळी उपोषणासाठी शेतकरी कामगार पक्ष ,लहुजी विद्रोही सेना ,हमाल मजूर सेवा सहकारी सोसायटी यासह इतर संघटनांनी पाठिंबा दिला .

या उपोषणादरम्यान जनविकास परिवर्तन आघाडी चे मा.हरूनभाई इनामदार तसेच भोसले सर , सीताताई बनसोड मॅडम , भाई मोहन गुंड , अशोक गायकवाड , विजय लांडगे आदिनी मार्गदर्शन केले .

साखळी उपोषणाची दखल घेत उपजिल्हाधिकारी शरद झाडगे तथा केज नगरपंचायतचे मुख्याधिकारी सचिन देशपांडे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्याच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एक महिन्याचे लेखी आश्वासन दिले लेखी अश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी सुरु असलेले बेमुदत साखळी उपोषण सोडण्यात आले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा