आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी् केल्याबद्दल डॉ.योगेश क्षीरसागर यांचा राज्य शासनाच्या वतीने गौरव




आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी् केल्याबद्दल डॉ.योगेश क्षीरसागर यांचा राज्य शासनाच्या वतीने गौरव
बीड। स्वातंत्र्य दिनानिमित्त वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल राज्य शासनाच्या वतीने जिल्हातून 3 हॉस्पिटल्सची निवड करण्यात आली. यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सौ. केशरबाई क्षीरसागर हॉस्पिटल व त्यांच्या सहकार्‍यांचा राज्य शासनाच्या वतीने निवड झाल्याबद्दल पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते डॉ.योगेश क्षीरसागर यांचा गौरव करण्यात आला.
सौ.के.एस.के.हॉस्पिटलची स्थापना सन 2014 साली करण्यात आली. हॉस्पिटलच्या  स्थापनेपासून स्व.काकू-नानांनी दाखवून दिलेल्या लोक कल्याणकारी मार्गाने यशस्वी वाटचाल करत हॉस्पिटलने वैद्यकिय क्षेत्रात अतुलनिय प्रगती केली आहे. त्याचबरोबर  लोकनेते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, प्राचार्या डॉ.दीपाताई क्षीरसागर यांचे मार्गदर्शन वेळोवेळी लाभत आहे.
सौ.केशरबाई क्षीरसागर हॉस्पिटलने या योजनेअंतर्गत 2018 च्या डिसेंबर महिन्यापासून ते आजतायगत 2900 मोफत शस्त्रक्रिया करून रुग्णांना मोठ्या प्रमाणात दिलासा देण्याचे काम केले आहे. या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने स्वातंत्र्य दिनी डॉ.योगेश क्षीरसागर यांचा गौरव केला आहे.
     स्वातंत्र्य दिनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा, जिल्हा पोलिस अधिक्षक रामास्वामी जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा