आ.संदीप क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त मैंदा येथील सर्व जनतेनी लसीकरण करुन घ्यावे- घुमरे




बीड l तालुक्यातील मैंदा येथील गावात आ.संदीपभैय्या क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त लसीकरणाची सुरुवात संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब डावकर यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी त्यांचा सर्व गावकर्‍यांनी सत्कार केला. त्यांच्यासमवेत त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.स्नेहा भाऊसाहेब डावकर यांचा सत्कार सौ.मिराताई गोरख घुमरे व छायाताई संजय घुमरे यांनी केला.

दमदार आमदार संदीपभैय्या क्षीरसागर यांचा वाढदिवस दि.२७ तारखेला आहे.त्यानिमित्ताने ग्रामीण व शहरी भागात गावोगावी वार्डावाडात भव्यदिव्य लसीकरणाची मोहीम आ.संदीपभैय्या यांच्या कार्यकर्त्यांनी हाती घेतली आहे.मैंदा येथे सर्व कार्यकर्त्यांनी मिळुन आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त लसीकरणाची सुरुवात केली आहे.गाव मोठं असल्याकारणानं येथे लसीकरण पुर्ण झाले नाही हि गोष्ट भाऊसाहेब काका डावकर यांच्या कानावर घातली.त्यांनी अजुन सोमवार यादिवशी मैंदा येथे लसीकरण सुरु ठेऊ असे सांगितले.आज जवळपास १००च्यापुढे लसीकरण मैंदा येथे झाले.
हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे जिल्हासरचिटणीस गुडाकांत घुमरे,गोरखभाऊ घुमरे,अवधूत बाप्पू,अश्रूबा गुरुजी घुमरे ,उत्तरेश्वर घुमरे , राजेभाऊ घोरड,राजेभाऊ हाडे,संतोष बप्पा घुमरे ,नितीन खोटे, प्रसाद घुमरे, राजेभाऊ भिताडे, शहादेव नाना कसबे,भास्कर कांबळे,संतोष पवार , बाबा घोरड सुनिल राठोड, बाळू राठोड.सुभाष मोमीन, आकाश राठोड. गणेश राठोड. अंकुश राठोड. लहू राठोड. राजेश राठोड. अंकुश पवार. शरद राठोड.अदींनी परिश्रम घेतले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा