बीडचे पोलीस प्रशासन आणखीही झोपेतच !




बीडमध्ये खाकीचा धाक संपला?

सात महिन्यात 85 बलात्काराचे गुन्हे दाखल।

बीड।  जिल्ह्यात  दररोज महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना समोर येत असल्याने, चिंता व्यक्त केली जात आहे. लहान मुलींपासून महिलांवर होणारे बलात्कार, मुलगा होत नाही म्हणून बळजबरीने गर्भपात, कौटुंबिक हिंसाचार, विनयभंग ,छेडछाड या सारख्या गुन्ह्याचे प्रमाण लॉकडाऊनमध्ये वाढले आहे. गेल्या सात महिन्यामध्ये तब्बल 638 महिला अत्याचारा संदर्भात गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आलीय. यात बलात्काराचे तब्बल 85 गुन्हे दाखल आहेत.यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न जिल्ह्यात ऐरणीवर आला आहे.

बीडच्या सुर्डी गावात 9 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, चौसळा येथे मुलगा होत नाही, म्हणून शिक्षकाकडून पत्नीचा सात वेळा गर्भपात, कडा गावात वंशाला दिवा पाहिजे म्हणून सासुकडून सुनेवर अत्याचार, परळीत 26 वर्षीय विवाहितेवर बलात्कार, नेकनूरमध्ये 25 वर्षीय विवाहितेवर बलात्कार यासारख्या असंख्य घटना जिल्ह्यात रोजच्याच झाल्या आहेत. यामुळं आता तरी पोलीस प्रशासन आणि पालकमंत्र्यांनी याकडं लक्ष देऊन, या गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी कठोर पावलं उचलली पाहिजे. अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने, रुमनं हातात घेऊन रस्त्यावर उतरू. असा इशारा शेकाप नेते भाई मोहन गुंड यांनी दिला आहे.

  

दरम्यान बीड जिल्ह्यात चाललंय तरी काय ? कुठं चिमुकलीवर अत्याचार होतोय. तर कुठं गुंगीचं औषध देऊन बलात्कार,तर कुठं शरीरसुखाची मागणी घेऊन महिलेला मारहाण, कौटुंबिक हिंसाचार बळजबरीने पळवून घेऊन जाणे, त्याचबरोबर गर्भपात आणि महिलांच्या गर्भाशय पिशवीचे प्रकरण, यामुळे एकूणच बीड जिल्ह्यातील महिला सुरक्षित आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात असून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी असणाऱ्या मुंडे बंधू-भगिनी यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तरच बीड जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचार कमी होतील

प्रमुख आकडेवारी

* बीडमध्ये लॉकडाऊनमध्ये महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले; बीड मधील महिला सुरक्षित आहे का?
* सात महिन्यात महिलांवर अत्याचारचे 638 गंभीर गुन्हे
* कौटूंबिक हिंसाचाराचे 244 प्रकरण
* सात महिन्यात 85 बलात्कार गुन्हे दाखल..
* पळवून नेणे – 59 गुन्हे
* छेडछाड – 6 गुन्हे
* हुंडा प्रतिबंधक कायदा – 3 गुन्हे
* मागच्या वर्षाच्या तुलनेत 248 गुन्हे वाढले
* यामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण
* लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने ठोस उपाययोजना करणं गरजेचं

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा