पूर्णवादी बँकेत १ कोटी ६५ लाखाचा घोटाळा




27AUG2021

पूर्णवादी बँकेला १ कोटी ६५ लाखाला फसविले बोगस कर्जघेणारा अटकेत

एका संचालकांचा त्यामध्ये हात असल्याचे बोलले जात आहे.

औरंगाबाद । दि .२६ ( प्रतिनिधी ) : – बँकैसह नागरिकांची फसवणूक करणाऱ्या परमेश्वर सूर्यभान नाझरकर रा.वाळूज याला पोलिसांनी अटक केली आहे . नाझरकरने पूर्णवादी बँकेच्या वाळूज शाखेतून १ कोटी ६५ लाख रुपयाचे कर्ज वोगस कागदपत्रे देऊन उचलले . बनावट दस्तऐवज , शिक्के वापरुन नाझरकरने अनेक बँकांची फसवणूक केली आहे . समर्थ पॉलिव्हिलच्या नावाखाली परमेश्वर नाझरकरने १ कोटी २० लाख रुपयांचे कर्ज तर गुरुमाऊली इंडस्ट्रीजच्या नावाखाली उज्वला परमेश्वर नाझरकर यांनी ४५ लाखाचे कर्ज असे १ कोटी ६५ लाखाचे बोगस कर्ज बँकेतून उचलले आहे . पूर्णवादी वकेचे अध्यक्ष सध्या बाहेरगावी असतात . इतर पदाधिकारी , संचालकही लक्ष देत नाहीत . बँकेचे ठराविक अधिकारीच संपूर्ण कारभार पाहतात , त्यामुळे असे प्रकार वाढले आहेत .

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा