राक्षसभुवन (शनिचे) अवैध वाळु उपश्याने घेतला सख्या बहिनिंचा जिव




प्रशासनाने वेळीच वाळुमाफीयावर अंकुश ठेवला असता तर दुर्दैवी घटना टळली असती ।
प्रशासनासह स्थानिकचे सत्ताधारी यांच्याविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची नागरीकातुन मागणी

गेवराई । (प्रतिनिधी) तालुक्यातील राक्षसभुवन (शनिचे) येथे गोदावरी नदी पात्रात आईसोबत धुणे धुण्यासाठी गेलेल्या नेहा धर्मराज कोरडे वय (९ वर्षे) आणि आमृता धर्मराज कोरडे वय (८ वर्षे) या दोन निरपराध चिमुकल्यांचा नदिपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना आज दि. २८ शनिवार रोजी दुपारी १२ वाजता घडली.
घटणेची माहिती मिळताच आजच चकलांबा पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्कर नवले यांनी कर्मचाऱ्यासह धाव घेत घटणास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उमापूर येथे पाठवले, याप्रकरणी चकलांबा पोलिसात अकस्मीत मृत्युची नोंद करण्यात आल्याची माहिती पोहेकॉ सिरसाठ यांनी दिली.
या घटणेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सदरील घटणा ही गोदावरी नदी पात्रात वाळु माफियांनी जेसीबी, केणीद्वारे वाळु उपसा केल्याने ठीकठीकाणी १० ते १५ फुट खोलवर खड्डे पडले आहेत.
अनेकदा स्थानिकांनी वाळु माफिया करत असलेल्या अवैध वाळु उपश्याची तक्रार व माहिती दिली मात्र काही महसुल व पोलिस प्रशासनातील हप्तेखोर अधिकारी कर्मचारी यांनी त्याकडे दुर्लक्ष्य करत राहिले.
अनेकदा अवैध वाळु उपश्याच्या बातम्या छापल्या  पुराव्यासह जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी, नायब तहसीलदार, चकलांबा पोलिसांना दिली त्यात्यावेळी तुटपुंजी कार्यवाही करुन स्वत:ची पाठ थोपटुन घेण्याचा प्रयत्न केला.

प्रशनातील अधिकारी एकमेकांवर चालढकलढ करत

कार्यवाही करण्यासाठी अनेकदा आमच्या प्रतिनिधीने मोबाईलवरुन संपर्क केला असता नायब तहसीलदार प्रशांत जाधवर पोलिसांना फोन करा किंवा तहसिलदार यांना मला वाळु संदर्भात कॉल करु नका तर तहसिलदार सचिन खाडे यांना संपर्क साधला असता चकलांबा पोलिसांना कॉल करा असे सांगायचे तसेच चकलांबा पोलिस ठाणे प्रमुख विजय देशमुख यांना संपर्क साधला तर महसुल अधिकारी यांना संपर्क करा असे सांगुन अशाप्रकारे प्रशासनातील अधिकारी एकमेकांवर ढकलुन कर्तव्यात कसूर करायचे.

नदी पात्रात वाळु माफियांनी खोलवर खड्डे केल्याने दोन चिमुकल्यांना जिव गमवावा लागला यास स्थानिकचे सरपंच, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांनी वाळु माफियांना सपोर्ट करत होते त्यांना जबाबदार धरून त्यांच्या विरोधात मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी नागरीकातुन मागणी होत आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा