देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षण सहसंचालक प्रा.वैजिनाथ खांडके यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न




देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षण सहसंचालक प्रा.वैजिनाथ खांडके यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न

बीड l (प्रतिनिधी): देवगिरी प्रतिष्ठान बीड च्या वतीने तुलसी इंग्लिश स्कूल येथे दि.२६ ऑगस्ट रोजी सायं ५:३० वाजता मा.प्रा.वैजिनाथ कोंडीबा खांडके(शिक्षण सहसंचालक,आयुक्त कार्यालय पुणे,महाराष्ट्र राज्य) यांच्या सेवापुर्ती सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.प्रदीप रोडे( देवगिरी प्रतिष्ठान, बीड) यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.सुधाकर बनाटे( निवृत्त शिक्षण उपसंचालक,औरंगाबाद),मा.डॉ.विक्रम सारुक(शिक्षणाधिकारी,(मा) जि.प.बीड),नानाभाऊ हजारे(उपशिक्षणाधिकारी, जि.प.बीड),मा.विलासराव जाधव(अध्यक्ष,जनता बहुउद्देशीय शिक्षण संस्था,औरंगाबाद),मा.कुलकर्णी साहेब(शिक्षणाधिकारी(प्रा)जि.प.बीड),मा.खटावकर साहेब(कार्यालीन अधीक्षक,जि.प.बीड),मा.काकडे साहेब(उपशिक्षणाधिकारी,जि.प.बीड),मा.रजनीताई वैजिनाथ खांडके,मा. दिपाताई प्रदीप रोडे(अध्यक्ष,तुलसी महिला मंडळ,बीड) यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच प्रा.वैजिनाथ कोंडीबा खांडके व रजनीताई खांडके यांचा सहपत्निक सत्कार प्रा.प्रदीप रोडे आणि दीपाताई रोडे यांच्या हस्ते शाल,पुष्पहार,स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रस्ताविक करतांना प्राचार्य डी.जी.निकाळजे यांनी प्रा.वैजिनाथ खांडके(शिक्षण सहसंचालक,आयुक्त कार्यालय पुणे,महाराष्ट्र राज्य) यांच्या कर्यालिन कामकाजात पारदर्शकता होती असे सांगून गरिबांची कामे आणि शेवटच्या घटकाला न्याय देण्याची भूमिका खांडके साहेबांनी पार पडली आहे असे सांगितले.
यावेळी मा.सुधाकर बनाटे( निवृत्त शिक्षण उपसंचालक,औरंगाबाद)यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना ज्ञानाची चकाकी काय असते हे आपल्या विवेचनातून सांगितले,मा.डॉ.विक्रम सारुक(शिक्षणाधिकारी,(मा) जि.प.बीड) यांनी आपल्या मनोगतात समाजासाठी काय करता येते हे ओळखले पाहिजे आणि त्या संधीचे सोने केले पाहिजे. घेणाऱ्या पेक्षा देणारे व्हा, देणाऱ्यालाच खूप महत्त्व असते असे त्यांनी सांगितले. ,मा.कुलकर्णी साहेब(शिक्षणाधिकारी(प्रा)जि.प.बीड) यांनी खांडके सरांच्या सद्गुणांची सावली आणि मार्गदर्शन लाभल्याचे सांगितले.अध्यक्षीय भाषणात प्रा.प्रदीप रोडे यांनी खांडके साहेब हे सर्वांसाठी कार्य करणारा प्रशासकीय अधिकारी असल्याचे सांगत एक योग्य मार्गदर्शक म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे असे मत व्यक्त केले.आपली जडणघडण करणाऱ्या मातीशी आजही नाळ जोडलेले व्यक्तिमत्व खांडके साहेबांच्या रूपाने दिसते आहे असे प्रा.प्रदीप रोडे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
यावेळी सत्कारमूर्ती प्रा.वैजिनाथ कोंडीबा खांडके(शिक्षण सहसंचालक,आयुक्त कार्यालय पुणे,महाराष्ट्र राज्य) हे आपल्या भाषणात म्हणाले की, गोरगरिबांची कामे केल्यामुळे मला प्राध्यापक ते शिक्षण सहसंचालक,आयुक्त हा प्रवास लाभला आहे. त्यांचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे. पदावर असताना शासनाच्या नियमाचे चुकीच्या मार्गाने काम केले नाही. माणसांसाठी नियम समोर ठेऊन काम केले. गोरगरिबांची कामे तत्काळ मार्गी लावली असे सांगत कौटुंबिक नातं जपताना आपल्या साथीची दक्षता घेतली असल्याचे त्यांनी म्हटले. हा सत्कार आपल्या माणसांकडून होतोय याचा आनंद वाटत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रसंगी खांडके साहेब यांनी हतोला या गावी कॉम्पुटर लॅब उभारण्याचा माणस केला आहे त्या लॅबला दोन संगणक देण्याचा मानस देवगरी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला आहे. यावरून प्रा.रोडे सरांचे दानत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अंकुश कोरडे यांनी केले तर आभार प्रा.योगिता लाडंगे यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला तुलसी शिक्षण समूहातील शिक्षक, प्राध्यापक,कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा