सायबर भामट्यांकडून  दोघांना गंडा




सायबर भामट्यांकडून  दोघांना गंडा

मराठवाडा न्यूज

बीड । ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत चालले असून , शहरातील आणखी दोघांना सायबर भामट्यांनी दीड लाख रुपयांना गंडा घातला . याप्रकरणी पेठ बीड व शहर ठाण्यात २७ ऑगस्ट रोजी गुन्हे नोंद झाले . गणेश हनुमान कपाळे ( वय २० , रा . एकतानगर , पेठ बीड ) हा शिक्षणासाठी पुण्यात राहत होता . २८ जून ते १३ जुलै | २०२१ या दरम्यान त्यास सायबर भामट्यांनी तीन वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून कॉल केले . तुला पैसे | मिळवून देतो , असे आमिष दाखविले . त्यांनी विश्वास संपादन करून व्हॉटसअॅपला चॅटिंग करून फोन पे व युपीआयडी क्रमांक मिळविला . त्याआधारे त्यांनी खात्यातील एक लाख ३५ हजार रुपये लंपास केले . याप्रकरणी गणेश कपाळेच्या तक्रारीवरून पेठ बीड ठाण्यात तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला . दुसऱ्या घटनेत नितीन मदनलाल वीर ( रा . शाहूनगर , बीड ) यांच्या एसबीआयच्या खात्यातून एटीएमद्वारे २० हजार रुपये काढून घेतले .

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा