अडीच हजार लीटर बायोडिझेलचा काळाबाजार; तिघे अटकेत




औरंगाबाद : बायोडिझेलचा काळाबाजार करणार्‍या तिघांना सिडको पोलिसांनी गजाआड केले. ही कारवाई शनिवारी जळगाव रोडवरील कलावती मंगल कार्यालयाजवळ करण्यात आली. सलमान इस्माईल खान (26, रा. सेंट्रल नाका व्हीआयपी फंक्शन हॉल समोर),  टेरेन्स विलियम लोबो (26, रा. पन्नालाल नगर, एकदंत अपार्टमेन्ट) आणि समशेर मेहबुब पठाण (44, रा. संजय नगर, बायजीपुरा) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून अडीच हजार लिटर बायोडिझेल, टेम्पो, पंप असा 5 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जळगाव रोडवरील पप्पु बिल्डींग मटेरीअल सप्लायर्सच्या बाजुला, कलावती मंगल कार्यालयाजवळ काहीजण अवैध बायोडिझेलचा साठा करीत असल्याची गोपनीय माहिती  सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार यांना मिळाली होती.  त्यानुसार कार्यवाही करण्यासाठी पुरवठा अधिकारी यांना माहिती देवून पुरवठा निरीक्षक कविता गिरणे यांना सोबत घेत सिडको पोलिसांच्या पथकाने छापा मारला. यावेळी सलमान खान, टेरेन्स लोबो आणि समशेर पठाण हे तिघे  टेम्पोमध्ये बायोडिझेल विक्री करण्याच्या उद्देश्याने साठवणूक करत असल्याचे आढळून आले. तिघांनी 200 लिटर प्रति क्षमतेचे 200 ड्रममध्ये बायोडिझेल साठा केल्याचे दिसून आले. पोलिसांनी कारवाईत टॅम्पो, मोटर पंप, असा 5 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करत सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिडको ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार,  विनोद सलगरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अवघड, पोलीस नाईक संतोष मुदीराज, विजयानंद गवळी, इरफान खान, सिध्दार्थ नवतुरे, गणेश नागरे, शाम काळे, शिनगारे, बिल्लारी, देशमुख, तडवी, पगारे यांनी केली.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा