बीडमध्ये हॉटेल गोल्डन चॉईसचे भव्य उद्घाटन




बीडमध्ये हॉटेल गोल्डन चॉईसचे भव्य उद्घाटन

संत-महंतांसह पदाधिकार्‍यांची हजेरी; दर्जेदार सेवा देणार -बप्पासाहेब घुगे

फोटो कॅप्शन
बीड : शहरातील हॉटेल गोल्डन चॉईसचे उदघाटन ह.भ.प. शिवाजी महाराज, ह.भ.प. रतन महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, जिल्हा समन्वयक तथा हॉटेलचे संचालक बप्पासाहेब घुगे, ऍड.तेजस नेहरकर दिसत आहेत.

बीड l
दि.30 : शहरातील बार्शी रोडलगत भगवानबाबा प्रतिष्ठानसमोर नव्याने सुरू झालेल्या हॉटेल गोल्डन चॉईसचे उद्घाटन नारायणगडाचे महंत ह.भ.प. शिवाजी महाराज, सासुरा येथील ह.भ.प. रतन महाराज यांच्या सोमवारी (दि.30) दुपारी 1 वाजता झाले. यावेळी महंतांनी नूतन व्यवसायासाठी शुभाशिर्वाद दिले.

 

यावेळी खा.डॉ.प्रीतमताई मुंडे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जेष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, आप्पासाहेब जाधव, माजी आमदार सुनील धांडे, केशव आंधळे, जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप, नगरसेवक डॉ.योगेश क्षीरसागर, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अ‍ॅड.संगीता चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकपर भाषणात बोलताना शिवसेनेचे जिल्हा समन्वयक तथा हॉटेलचे संचालक बप्पासाहेब घुगे म्हणाले की, शहरातील सर्व सोयी सुविधायुक्त असे हॉटेल सुरु करत आहे. या माध्यमातून होतकरू तरूणांना रोजगार देखील उपलब्ध होईल. तसेच, ग्राहकांना सेवा देताना दर्जा राखला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप गोरे, माजी जि.प.सदस्य राजेंद्र राऊत, तालुकाप्रमुख गोरख सिंगण, जि.प.सदस्य विजयकांत मुंडे, उद्योजक पापा गिते, रमेश आजबे, अरूण डाके, दिनकर कदम, भाजप नेते नवनाथ शिराळे, बबन गिते, भगवान सेनेचे मुरलीधर ढाकणे, युवासेना जिल्हाप्रमुख सागर बहीर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख हनुमंत पिंगळे, पं.स. सदस्य पिंटू ठोंबरे, सरपंच सचिन घोडके, गणेश खांडे यांच्यासह राजकीय, सामाजिक, धार्मिक, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी भेटून बप्पासाहेब घुगे यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महादेव चाटे यांनी केले. तर लालासाहेब घुगे यांनी आभार मानले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा