मॅनेज असणाऱ्या लाभार्थी कार्यकर्त्यानी आकल पाजळू नये? तोंड संभाळून बोलावे -बागल

 

आ. संदीप भैय्यांनी बीड शहरासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला ! त्या विकास कामात अडकाठी आणू नका !

जयम्हलार बागल ,माजी सभापती खुर्शिद आलम यांचे सडेतोड पत्रक

बीड। कोणत्याही कामात मॅनेज असणाऱ्या
लाभार्थी कार्यकर्त्यांनी तोंड संभाळून बोलावे, कुठलाही अभयास न करता आपली एकल पाजळू नये. महाराष्ट्र शासनाने असे धोरण स्वीकारले की ज्या ठिकाणी विकास कामांना शंभर टक्के अनुदान आहे अशा ठिकाणी स्थानिक आमदार यांच्या सूचनेनुसार विकास कामाची यंत्रणा बदलता येते. मुळात बीड नगर पालिकेने सन 2012 -2013 मध्ये मंजूर असलेली विकास कामे पूर्ण केली नाहीत, ते कामे अर्धवट अवस्थेत आहेत. आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून कोट्यवधी रुपयांचा निधी बीड शहराच्या विकासाठी आणलेला आहे, या निधीतील विकासकामे रखडल्या जाऊ नयेत,गुणवत्ता पूर्ण कामे व्हावीत यासाठी यंत्रणेत पालिका सोडून सार्वजनिक बांधकाम विभाग बीड 1 करण्यात आली आहे. सदर कामे नगर परिषदने करावीत यासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली त्यामुळे प्रक्रिया लांबणीवर पडली, विकास कामत खीळ कोण घालत आहे, तीस वर्षांपासून बीडचा विकास कोणाला करता आला नाही हेजनतेला चांगलंच माहीत आहे. या पुढे लाभार्थी कार्यकर्त्याने तोंड संभाळून बोलावे नसता वेगळ्या भाषेत उत्तर दिल्या जाईल असा इशारा जयम्हलार बागल, नगर परिषद माजी सभापती खुर्शीद आलम यांनी दिला आहे.

बीडचे स्थानिक आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांनी dpdc व शासनाच्या विविध योजना अंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणलं असून काही महत्वाची कामे प्रस्तवित केलेली आहेत. या मध्ये बार्शी नाका ते यासीर कटपीस, झमझम कॉलनी ते सर सयद स्कुल, राज हॉटेल ते भारत सौ मिल,मुख्य रस्ता ते सावरकर विद्यालय ,कारंजा ते आजीजपुरा,मुख्य रस्ता ते दीप हॉस्पिटल रिपोर्टर कार्यालय ,मुख्य रस्ता ते काजी नगर यासह शहरातील इतर कामांचा समावेश आहे. ही कामे झाली तर यांचे श्रेय स्थानिक आमदार याना जाईल असा कपटी पना डोळ्यासमोर ठेऊन बीड नगर परिषद ने दि.३.८.२०२१ रोजी विशेष सभा घेऊन २७ कोटी रुपयांची कामे मंजूर केली असल्याचा ठराव घेतला,वास्तवीक पाहता नगराध्यक्ष यांना माहीत आहे की बीड नगर परिषद ने सन 2021 व 2022 मधील रस्ते व नाल्यांसाठी फक्त 3 कोटी 50 लक्ष रुपयांची तरतुद केलेली आहे. नगर परिषद जास्त कामे करता येत नाहीत हे माहीत असतात सुध्दा फक्त स्थानिक आमदार यांना कामे करता येऊ नयेत म्हणून रडीचा डाव खेळला जात आहे. आता हे सर्व बीड च्या जनतेला माहीत झालं असून सुपारी बहाद्दर जोडीनं हिशोबात राहावं असा सलाही सडेतोड पत्रकातून जयम्हलार बागल, सभापती खुर्शिद आलम यांनी दिला आहे.

वीज बिल थकल्याने शहरातील पथदिवे बंद आहेत, शहरातील अंधारामुळे चोऱ्याचे प्रमाण वाढले आहे. शहरासाठी पाणी उपलब्ध असताना व योजना परिपूर्ण असताना बीड शहरातील जनतेला 15 दिवसाला पाणी मिळते,नागरिकांना कर भरूनही पालिका सुविधा देण्यास असमर्थ ठरत आहे, केवळ चांगल्या कामच श्रेय घेणाऱ्यांनी नागरिकांना सुविधा मिळत नाहीत त्यावरही बोलावे, उगीच प्रसिद्धसाठी थयथयाट करू नये.स्थानीक आमदार यांना श्रेय घेयचेच असते तर त्यांनी करोना काळात पालिकेच्या भरवशावर न राहता स्वतः यंत्रणा उभारली, कोव्हिडं काळात जनतेला आधार दिला ,सेनेटझर फवारणी ,स्वच्छता आदी कामे करून घेतली. उगीच उठ सूट कशाचेही श्रेय घेण्या आगोदर आपल्या वार्डाच भगवं असा टोलाही लगावला आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा