पिंपळनेर परिसरात मुसळधार पाऊस दोन पुल खचले; शेतीचेही नुकसान




पिंपळनेर परिसरात मुसळधार पाऊस
दोन पुल खचले, शेतीचेही नुकसान
पिंपळनेर / प्रतिनिधी : बीड तालुक्यातील पिंपळनेर परिसरात 30 आँगस्ट रोजी रात्री तब्बल अडीच ते तीन तास झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले असून दोन पुल खचले तर नदीकाठच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.


पिंपळनेर परिसरात सोमवारी रात्री पावसाने जोरदार बँटींग केली दहा ते रात्री एक वाजेपर्यत जोरदार पाऊस झाला. या पावसाने शेत शिवारात सर्वत्र पाणी झाले असून पिंपळनेरच्या दोन्ही नद्यांना  महापूर आला. नदीचे पात्र सोडून 100 ते 150 मिटर अंतरापर्यत शेतामध्ये पाणी शिरले होते. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून पिंपळनेर ते नाथापूर रोड तसेच बीड ते माजलगाव रोडवरील दोन्ही पुल खचले आहेत. यामुळे वाहतुकीस अडथळा होणार असून दुरुस्तीची मागणी होत आहे तर दुसरीकडे शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करावीत अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा