कनक इंटरप्राइजेसचे गुत्तेदार ‘हमीद चाऊस’ याच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल




कनक इंटरप्राइजेसचे गुत्तेदार ‘हमीद चाऊस’ याच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

बीड : नगर परिषदेच्या सफाई विभागाला मजूर पुरवणाऱ्या कनक इंटरप्राइजेच्या गुत्तेदारावर ऐका सफाई कामगार महिलेच्या फिर्यादीवरून बीड शहर पोलिस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की बीड नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात साबीर कन्स्ट्रक्शन व सफाई विभागात कनक इंटरप्राइजेस नामक संस्था मजूर पुरवत आहे, या दोनीही संस्थेचे कंत्राटदार हमीद चाऊस हा आहे, सदरील संस्थेच्या कंत्राटदाराकडे म्हणजे हमीद चाऊस यांच्याकडे मागील तीन महिन्यांपासून कामगारांच्या पगारी थकीत आहेत त्या मागणीसाठी सफाई कामगार महिला गेल्या अनेक दिवसांपासून बीड नगर परिषदेत ऐका संघटनेच्या माध्यमातून उपोषन करत आहेत सदरील महिला सकाळी काम करून दुपारी नगर परिषदेच्या आवारात उपोषणास बसत असत यातीलच ऐका सफाईक कामगार महिलेच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखक काण्यात आला आहे.
सरील फिर्यादी महिलेने बीड शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की मी व माझ्या असहकारी महिला शुक्रवारी दि ३ रोजी सकाळी कनक इंटरप्राइजेस चे कार्यालय निवारा ईमारत बीड येथे ०८ : ०० वा च्या सुमारास सफाईच्या कामासाठी गेल्या असता तेथे कनक इंटरप्राइजेस चे ‘हमीद चाऊस’ आले तेव्हा आम्ही त्यांना म्हणालोत की आम्हाला एक महिन्याच्या पगार नकोय आम्हाला दोन महिन्याचा पगार पाहिजे, जर आम्हाला दोन महिन्यांचा पगार नाही दिला तर आम्ही सफाई काम करणार नाही असे आम्ही म्हणालो.

त्यावर कंपनीचे ‘हमीद चाऊस’ माझ्यावर ओरडून म्हणाले की तुमचा ‘महारा मांगांचा असाच कालवा असतो’ उद्यपासून कामावर येऊ नका असे जातीवाचक उद्गार कडून सर्वांसमोर माझा पाणउतारा केला व मला अपमानित केले आणि माझ्या सहकारी महिलांना म्हणाला ह्या अनिता बचुटे च्या बहिकाव्यात येऊ नका, त्यानंतर मी त्यांना म्हणाले आमच्या आजच्या हजऱ्या टाका म्हणत टेबलावरील कागद घेतला त्यावर हमीद चाऊस यांनी माझ्या हातातील कागद हिसकून घेऊन निघून गेला त्यानंतर आम्ही महिलांनी बसून विचार केला आणि मी ठाण्यात तक्रार देण्यास आले आहे असे फिर्यादीत म्हंटले आहे.

सदरील गुन्हा ‘अनिता बिभीषण बचुटे’ वय ४२ वर्ष राहणार इंद्र नगर, बीड शहर यांच्या फिर्यादीवरून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप अटक नसल्याची माहिती आहे, सदरील गुण्याचा तपास पोलीस उपअधीक्षक बीड हे करीत असल्याची माहिती बीड शहर पोलिसांनी दिली आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा