पोळ्यानिमित्‍ताने रविवारीही बाजार फुललेला; बळीराजा साजचे साहित्‍य खरेदीसाठी




 

पोळ्यानिमित्‍ताने रविवारीही बाजार फुललेला; बळीराजा साजचे साहित्‍य खरेदीसाठ

Daily Marathwad patra Teem

Date:05 सप्टेंबर 2021

बीड : शेतकऱ्यांचा सवंगडी असलेला बळीराजाचा सण अवघ्या एक दिवसांवर येवून ठेपला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांकडून बैलांना सजविण्यासाठी लागणारे साहित्य खरेदीची लगबग सुरु झाली असून विविध साहित्यांनी बाजारपेठ फुलली आहे.
जगाचा पोशिंदा असलेला शेतकऱ्यांच्या सर्जा राजाचा सण पोळा हा अवघ्या एक दोन दिवसावर येवून ठेपला आहे. त्यामुळे सणासाठी लागणाऱ्या साहित्यांनी बाजारपेठ फुलून निघाल्या आहेत. तर खरेदीसाठी शेतकरी बांधवांची लगबग सुरु आहे. शहरातील बाजारपेठांमध्ये पोळ्याच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांकडून मोठी गर्दी केली जात आहे. या सणाच्या पार्शवभूमीवर बैलांच्या सजावटी साठी लागणारे दोर, झुला, नात, मोरखी, गोंडा, भोरकडी, कडी, गेठा, रंग, लटी यासारखे विविध साहित्य बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहे. त्याचबरोबर पैंजण, घंटी, कड्या, घुंगरु, शेल्पा आदी पितळाच्या वस्तुंसह स्टिलच्या रिंगचीही विक्री बाजारात होत आहेत.

पेंट कलर सोबत गेरूचीही विक्री
शेतकऱ्यांकडून कृष्ण, शिवाजी महाराज, बळीराजा यांसारख्या नक्षी काम करण्यात आलेल्या झुल खरेदी केल्या जात आहे. त्यापैकी पंढरपूरी झुलला सर्वाधिक पसंती दिली जात असल्‍याचे दिसून येत आहे. तर बळीराजाला सजवण्यासाठी वापरण्यात येणारे ऑईल पेंट व कोरड्या रंगसह पारंपारीक रंग म्हणजे गेरु, शेंदुर यांसारखे रंग देखील बाजारात विक्री साठी दाखल झाले आहे. त्याचबरोबर पोळा या सणाला बैलांची पूजा केली जाता असल्‍याने मातीचे बैल देखील बाजारात विक्रीसाठी आले होते.

काल झालेल्या पावसानंतर उद्याच्या पोळ्याच्या खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची झुंबड उडाली. सुखावलेला शेतकरी बाजारात आल्याने पोळ्याचा बाजार असा फुलला होता. छायाचित्र टिपले आहे अँड. अजित देशमुख यांनी.

नारळाचीही मोठी उलाढाल
पोळा या सणाला बैलासोबत नारळ देण्याची परंपरा असल्‍याने नरळाची देखील मोठ्या प्रमाणात विक्री होताना दिसून येत आहे. एकंदर पोळा या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

नारळाचीही मोठी उलाढाल

पोळा या सणाला बैलासोबत नारळ देण्याची परंपरा असल्‍याने नरळाची देखील मोठ्या प्रमाणात विक्री होताना दिसून येत आहे. एकंदर पोळा या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा