ब्लॅकमेल करत विवाहित महिलेवर अत्याचार




ब्लॅकमेल करत विवाहित महिलेवर अत्याचार
माजलगाव तालुक्यातील घटना
आरोपी विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल |
माजलगाव
तुझे आणि माझे जुने प्रेम संबंध तुझ्या नवऱ्याला व तुझ्या कुटुंबीयांना सांगून तुझा संसार उध्वस्त करील,अशी धमकी देत एका पस्तीस वर्षाच्या महिलेवर सात वर्षे सतत अत्याचार करण्यात आला.ही घटना माजलगाव तालुक्यात २०१६ ते २०२३ च्या दरम्यान घडली.दरम्यान पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध दि.२३ डिसेंबर २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की,माजलगाव तालुक्यातील एका महिलेचे प्रमोद मुंजा पराड (राहणार शिक्षक कॉलनी मंजरथ रोड माजलगाव) व्यक्तीसोबत प्रेम संबंध होते.नंतरच्या काळात त्या महिलेचा विवाह इतर पुरुषासोबत झाला.त्यानंतरही पराड याच्याकडून त्या महिलेला सतत शरीर सुखाची मागणी पराड याच्याकडून करण्यात येऊ लागली.तसे न करू दिल्यास तुझे आणि माझे प्रेम संबंध तुझ्या नवऱ्याला व तुझ्या कुटुंबीयांना सांगेल अशी धमकी देत ब्लॅकमेल करत पराड याने त्या विवाहित महिलेवर तिच्या राहत्या घरी व शेतात सतत २०१६ ते २०२३ च्या दरम्यान शारीरिक अत्याचार केला.तुला माझ्यासोबत यावे लागेल,तू माझ्यासोबत चल असे म्हणत पराड याने विवाहित महिलेच्या पतीला शिविगाळ मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली.दरम्यान २३ डिसेंबर शनिवार रोजी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी प्रमोद मुंजा पराड याच्याविरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ३७६,(२)छ,३२३,५०४, ५०६ भादविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पिंक पथकाचे साह्यक पोलिस निरीक्षक अविनाश राठोड हे करत असुन,या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार आहे.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा