आमदार साहेब आता तरी सुधरा जयदत्त आण्णांनी व अध्यक्षसाहेबांनी मंजुरी व निधी मिळवलेल्या कामावर जाऊन उदघाटन करता ! स्वतः काहीतरी आणा मग खुशाल उदघाटने करा- गुंजाळ




बीड दि.६ (प्रतिनिधी):- पेठ बीड भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उदघाटन अध्यक्षसाहेब व सर्व पेठ भागातील नगरसेवकांच्या उपस्थितीत काही दिवसापूर्वीच झाले होते. परंतु सोमवारी पुन्हा एकदा त्याचे उदघाटन आमदार महोदयांनी केले. यामुळे याची चविष्ट चर्चा होत होती,आमदार महोदय आण्णासाहेब व अध्यक्ष साहेबांनी ज्या कामांसाठी निधी मंजूर करून आणला त्याचेच उदघाटने किती दिवस करणार? अगोदर सुरू असलेल्या कामावर जाऊन फोटो सेशन करत होतात आता तर सरळ उद्घघाटनेच  करायलात की जरा स्वतः प्रस्ताव टाकून कामे मंजूर करून आणा निधी आणा मग खुशाल उदघाटन करा असा सल्ला नगरसेवक विकास जोगदंड, बाळासाहेब गुंजाळ यांनी दिला आहे.
मुळात विषय हा आहे की हे आरोग्य केंद्र मंजूर करावे यासाठी ४ वर्षापूर्वी प्रस्ताव  माजी मंत्री जयदत्त आण्ण्णांच्या माध्यमातून नगराध्यक्ष साहेबांनी पाठवला होता. तो मंजुर झाला त्यानंतर त्यांच्या सुचनेवरुन यंञणेने जागा देखील शोधली. निधी मिळवला मग आता आमदार महोदय तुमचा याच्याशी सबंध काय? हा जर तुम्ही यासाठी प्रस्ताव दिला असता,जागा मिळविली असती,निधी मिळवला असता तर ठिक होतं परंतु यातील काहीही आपण केलेले नसताना लोकांची दिशाभुल का करता, तुम्ही एखादे असे आरोग्य केंद्र सरकारच्या माध्यमातून आणा व खुशाल उदघाटन करत बसा. पण आयत्या पिठावर रेघुट्या नका मारु,जनता हुशार आहे त्यांना कळते कोण काय करते ते.आणि हे काम नगरपालिकेचे आहे तुमचा लांबपर्यंत याच्याशी सबंध नाही,जी कामे आण्णासाहेब व नगराध्यक्ष साहेबांनी मंजूर करून आणली त्याचेच उदघाटने किती दिवस करत बसणार जरा स्वतः काही कामे आणून जगजाहीर उदघाटन करा असे बाळासाहेब गुंजाळ, विकास जोगदंड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा