परळी- अंबाजोगाई महामार्ग वाहतुकीसाठी बंद




परळी- अंबाजोगाई महामार्ग वाहतुकीसाठी बंद

पंचक्रोशीतील नद्या-नाल्यांना आला पूर पर्यायी रस्त्याचा वापर करावा

परळी /प्रतिनिधी

बीड जिल्ह्यात झालेल्या पावसाने रस्त्यांची वाताहत झाली आहे. परळी- अंबाजोगाई महामार्गाचे काम सुरु असून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असल्याची माहिती परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांनी सांगितले.

राष्ट्रीय महामार्गाच्या कामानिमित्त परळी-अंबाजोगाई मार्गावरील कण्हेरवाडी शिवारात उभारण्यात येत असलेल्या पुलाजवळील वळण रस्ता व तात्पुरता पुलावरून पाणी वाहत असल्याने परळी-अंबाजोगाई मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

  • कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मारोती मुंडे व त्यांचे सहकारी भर पावसात घडनास्थळी परिस्थिती हाताळत आहेत. बीड जिल्ह्यात पावसामुळे छोट्या नद्या नाले यांना पूर आल्याने अनेक गावांचा तुटला आहे. तर पूले पाण्याखाली गेले आहेत.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा