शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 25 हजार मदत द्या- गणपत डोईफोडे




म्हाळस जवळा व पिंपळनेर मंडळातील शेतकऱ्यांना 25 हजार हेक्टरी मदत द्या ।
शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान। पाऊसाचा रुद्र अवतार ।।
पिंपळनेर ,  महसूल मंडळात अतिवृष्टी !
पालकमंत्र्यांनी तात्काळ लक्ष घालून पंचनामा करण्याच्या सूचना द्याव्यात ।

पिंपळनेर  भागातील शेती पाण्यात
पिंपळनेर (प्रतिनिधी ) सर्वत्र झालेल्या पावसाने शेती व शेतकरी हवालदिल झाला असून, पिंपळनेर सर्कल मध्ये सर्व मंडळातील पिके पाण्याखाली गेले असून पीक व पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. याची भरपाई म्हणून सरसकट 25 हजार प्रति अडीच एक्कर ला द्यावेत . अशी मागणी जी. प. सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गणपत डोईफोडे यांनी केली आहे .
म्हाळस जवळा मंडळातील पूरग्रस्त भागाची पाहणी गणपत डोईफोडे यांनी केली यावेळी त्यांच्या समवेत प्रशासनातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

मंगळवार दि.७ दुपारी ४ ते ६ च्या दरम्यान अंदाजे तब्बल ११३ मिलीमीटर पाऊस झाला आहे, या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, अक्षरशः पिंपळनेर सर्कल मधील दुपारी 5 वा. पर्यंत अनेक  शशेतातील पिकं पाण्याखाली गेली  आले, जमीन व पिकाचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पिंपळनेर, नाथापूर ,कुक्कडगाव सह अनेक गाव  पाण्यात आहेत व या गावातील लोकांच्या घरांची पडझड झाली, हातचे आलेले सोयाबीन, कापुस तुर पिके पावसामुळे गेली आहे. बीड तालुक्यातील शिल्पनां नदीला खूप मोठा पूर आल्याचे  येथील गावकऱ्यांचे नुकसान झाल्याचे अक्षरशः आपल्या डोळ्यासमोर पाहण्याचा असा प्रसंग या गावकऱ्यांना पहावयास मिळाला.
बिंदुसरा नदी पण ओव्हर फ्लो झाल्याने ते पाणी कुक्कडगाव येथील शिल्पनां नदीला पुर आला  आला कारण या नदीचा एवढा मोठा उद्रेक होता की, अक्षरशः या नदी काठच्या व आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांच्या शेतात नदीचे पाणी गेल्याने खुप मोठा प्रमाणात नुकसान झाले आहे, प्रवाह एवढा मोठा आहे की, अक्षरशः रस्त्यावरून पाणी शेतात घुसले सर्व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी मा. ना. धनंजय मुंडे पालकमंत्री व सामाजिक न्याय मंत्री यांनी तात्काळ शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पंचनामा करण्यात यावा असे आदेश देऊन मायबाप शेतकऱ्यांच्या पिकांचे जे  नुकसान झाले आहे, त्यांना हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत करावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गणपत डोईफोडे यांनी केली आहे .
या आसपास च्या शेकर्यांच्या मागण्या या वेळी थेट शेतामध्ये जाऊन त्यांनी ऐकून घेतल्या। शेतकऱ्यांचे नुकसान कापूस, सोयाबीन ,मूग, तूर, सूर्यफूल, उडीद,मका,बाजरी,इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे. म्हाळस जवळा महसुल मंडळाचे मंडळ अधीकारी नितीन जाधव सकाळपासून मंडळात होते, पिकांच्या नुकसानीच्या पाहणी बरोबरच नदी काठच्या नागरीकांना सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा