नेकनुरात खुलेआम मटका सुरू ;अनेकांचे संसार उघड्यावर!




नेकनुरात खुलेआम मटका सुरू ;अनेकांचे संसार उघड्यावर !

नेकनूर – दि 19 रामनाथ घोडके

अवैध धंद्यांना चाप लावून कायदा सुव्यवस्था टिकवणे हे पोलिसांचे आद्य कर्तव्य, मात्र याच कर्तव्यात कसूर होत आहे. मटका, जुगार याकडे होणारे पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आणि अर्थपूर्ण वाटाघाटींमुळेच नेकनूर शहरात अवैध धंदे फोफावले आहेत. अवैध धंद्यांवर कारवाई करण्यापेक्षा त्यांना छुपे संरक्षण देण्याचेच काम पोलिसांकडून सुरू आहे, त्यामुळेच नेकनूर परिसरात राजरोस मटका अड्डे सुरू असल्याचे दिसून येत असून या बाबत आता वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार याची चर्चा आता सुरू झाली आहे.

नेकनूर बसस्थानक, ग्रामपंचायत च्या पाठीमागे,लाईट ऑफिस आवारात, पोलीस स्टेशन च्या हाकेच्या अंतरावर ठीक ठिकाणच्या टपऱ्यावर वर्दळीच्या ठिकाणीही मटक्याच्या पाट्या आणि चिठ्ठ्यांचे खच पडल्याचे चित्र दिसत आहे. याबाबत पोलिस ठाण्यांतील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, ‘शांतता आहे’ असे उत्तर देऊन वेळ मारून नेली जात आहे. शहरातील मटका अड्डे चालवणाऱ्या सूत्रधारांवरच एपीआय शेख मुस्तफा कधी कारवाईचा बडगा उगारून गोरगरिबांचे संसार वाचावेत असे नागरिकाकडून अपेक्षा केली जात आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा