शेतकऱ्यांच्या हितासाठी बंद मध्ये सहभागी व्हा – गणेश बजगुडे पाटील




२७ सप्टेबर रोजी होणाऱ्या भारत बंदला शिवक्रांती संघटनेचा पाठिंबा !

बीड :- केंद्र सरकारने भांडवलदारांच्या हितासाठी शेतकरी विरोधी काळे कायदे शेतकऱ्यांचा विरोध असताना माथी मारण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. याला विरोध म्हणून दिल्ली स्थित आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरातील सर्व शेतकरी, शेतमजूर संघटना, पक्ष व समविचारी संघटनेने दिनांक २७ सप्टेंबर २०२१ रोजी भारत बंदची हाक दिलेली आहे. या आंदोलनाला शिवक्रांती संघटनेने पाठिंबा दर्शवत आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन शिवक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश बजगुडे पाटील यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना भांडवलदारांच्या घश्यात घालणारे हे सरकार असून कॉन्ट्रॅक्ट पद्धतीची शेती व एपीएमसीचे अधिकार कमी करण्याविषयी शेतकऱ्यांचा व शेतकरी संघटनांचा विरोध असताना देखील हे सरकार असले शेतकरी विरोधी काळे कायदे लादण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकरी आज हवालदिल झालेला असताना पुन्हा असले जुलमी कायदे लादणे चुकीचे असून शेतकरी जगला तरच सर्व जगतील याचा प्रामुख्याने विचार करायला हवा नाही तर मराठवाड्यातील जनतेने रजाकाराचा काळ आणुभवलेला आहे आशीच काहीशी परिस्थिती निर्माण होईल म्हणुन आशा जुलमी कायद्याच्या विरोधात देशभरात प्रचंड संताप व उद्रेक होत असून दिनांक २७ रोजी भारत बंद च्या माध्यमातून याला विरोध करण्यासाठी सर्व शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी बांधवांनी सहभागी व्हावे त्याच बरोबर हा बंद शांततेच्या मार्गाने आहे व्यापारी बांधवांनी ही आंदोलनाला पाठिंबा दर्शवला पाहिजे कारण शेतकरी टिकला तर व्यापार टिकेल असे आव्हान शिवक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी कष्टकऱ्यांचे नेते गणेश दादा बजगुडे पाटील यांनी केले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा