भरधाव क्रेटा ने घेतला दोघांचा बळी !




भर धाव क्रेटा ने घेतला दोघांचा बळी !

नेकनूर मांजरसुमबा रोडवर भीषण अपघात

नेकनूर – दि २३ वार्ताहार

कामा निमित्त नेकनूर येथे आलेल्या खंडाळा येथील फौजीच्या दुचाकीला समोरून भरधाव वेगात आलेल्या क्रेटा गाडीने जोराची धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात फौजीसह त्यांच्या मित्राचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मांजरसुंबा नेकनुर रस्त्यावरील रविंद्र धाब्यासमोर घडली . उमेश अभिमान सिरसाट रा खंडाळा वय ३७ वर्षे , विष्णु शंकर काटे , वय ४९वर्ष रा . खंडाळा असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत . उमेश अभिमान सिरसाट हे फौजी होते . सध्या ते बेळगाव कर्नाटक येथे कार्यरत होते . मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी ते सुट्टी घेवून गावी आले होते . आज कामा निमित्त नेकनूर येथे आल्यानंतर काम आटोपून ते सायंकाळी त्यांच्या मित्रासह दुचाकीवर जात असतांना मांजरसुबा- नेकनुर रसत्यावरील रविंद्र धाब्यासमोर त्यांच्या दुचाकीला क्र . एम . एच . १४ – बी.ई – ९५४२ ला समोरून येणाऱ्या क्रेटा क्र . एम.एच .१३ – सी.एस .८०६९ ने जोराची धडक़ दिली . झालेल्या भिषण अपघातात फौजीसह त्यांचा मित्र जागीच ठार झाला . घटनेची माहिती नेकनुर पोलिसांना मिळताच घटनास्थळी राठोड , सोनवणे , पवार , राऊत , अनवणे , मजहर भाई यांनी धाव घेतली .मृतदेह शवविच्छेदनासाठी नेकनुरच्या रुग्णालया आणण्यात आले आहे .

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा