राज्याला पुन्हा मुसळधार पावसाचा धोका





पुणे : मागील आठवड्यापासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यानंतर आता राज्याला पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा धोका आहे. सध्या बंगालच्या उपसागरात हवेचा एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या हवेने बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. याचा परिणाम म्हणून आजपासून मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे, हवामान खात्याकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.
आज सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, मुंबई, ठाणे, पालघर, चंद्रपूर, भंडारा, गोदिया आणि गडचिरोली हे दहा जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडणार आहे, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. भारतीय हवामान खात्याने आज पुण्यासह, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी येलो अलर्ट जारी केला आहे.पुढील काही तासांत संबंधित जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुढील पाच दिवस राज्यात हीच स्थिती कायम असणार आहे. तर विकेंडनंतर राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उद्या पूर्व विदर्भातील काही जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. सोमवारी देखील राज्यात हीच परिस्थिती कायम राहीले. औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर मंगळवारी नंदुरबार, धुळे, जळगाव, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा