शेतकरी आक्रमक : देशव्यापी भारत बंद; शेकडो वाहनांच्या लांबच लांब रांगा 




 

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या नव्या ३ कृषी कायद्यांविरोधात शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहे. या चिडलेल्या शेतकऱ्यांनी देशाची राजधानी दिल्लीतून देशव्यापी भारत बंदची हाक दिली. त्याला सर्वत्र मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमेवर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेल्या आहेत. येणारे जाणारे प्रत्येक वाहन सुरक्षा दलाकडून तपासले जात आहे. मात्र, यामुळे दिल्ली गुडगाव सीमेवर वाहनांचा मोठा खोळंबा झाला आहे. शेकडो वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. दिल्लीच्या प्रत्येक सीमेवर जवळपास हेच चित्र आहे.

दुर्लक्ष केल्याने वाहतूक कोंडी : ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या लोकांकाडून सोशल मीडियावर संतापही व्यक्त केला जात आहे.  याला आता शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, “नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून शेतकऱ्यांच्या मागणीसाठी भारत बंद होणार आहे याची माहिती आधीच दिली होती. या भारत बंदच्या काळात सकाळी ६ ते सांयकाळी ४ या वेळेत वाहतूक खोळंबा होऊ शकतो याबाबत आम्ही आधीच सतर्क केले होते. ज्यांनी या माहितीकडे दुर्लक्ष केले. त्यांना या अडचणीला सामोरे जावे लागत आहे, असे टिकैत म्हणाले आहे.
नागरिकांनी दुपारच्या जेवणानंतर घराबाहेर पडावे असे आम्ही नागरिकांना आवाहन केले होते.  मात्र, याकडे कुणीही लक्ष दिले नाही. जोपर्यंत नवे कृषी कायदे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन सुरूच ठेऊ. यासाठी १० वर्षे लागली तरी चालतील, असे राकेश टिकैत यांनी नमूद केले आहे.

विरोधी पक्षांकडून भारत बंदला पाठिंबा : काँग्रेस नेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह देशातील अनेक विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या या भारत बंदला पाठिंबा दिला आहे. राहुल गांधी म्हणाले, शेतकऱ्यांचा अहिंसक सत्याग्रह अखंडपणे सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्या सरकारला हे आवडत नसल्यानं हा भारत बंद आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा